गोविंद केंद्रे ठरले लातूर जिल्ह्याचे स्काऊट गाईड चळवळीतील सर्वोच्च प्रशिक्षण पूर्ण करणारे पहिले मानकरी

मागील वर्षी दिनांक एक डिसेंबर ते सात डिसेंबर २०२३ दरम्यान स्काऊट गाईड राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र पंचमढी मध्य प्रदेश या ठिकाणी संपन्न झालेल्या स्काऊट गाईड चळवळीतील युनिट लीडर यांचे सर्वोच्च प्रशिक्षण लीडर ट्रेनर या प्रशिक्षणाचा निकाल नुकताच महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स राज्य कार्यालय मरीन लाइन्स मुंबई येथे प्राप्त झाला. यामध्ये राज्याचे सहाय्यक राज्य प्रशिक्षण आयुक्त स्काऊट गोविंद केंद्रे यांनी यश संपादन केले..
विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यातून सदरील प्रशिक्षण यशस्वी करणारे ते लातूर जिल्ह्याचे पहिले मानकरी ठरले..
त्यांचे मूळ गाव सैनिक केंद्रेवाडी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर हे असून वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचे वास्तव्य व शैक्षणिक कार्यकाल नांदेड या ठिकाणी झाला.
ते विद्यार्थी दशेपासूनच स्काऊट गाईड चळवळीमध्ये सक्रिय होते त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरबडा तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे झाले असून माध्यमिक शिक्षण जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा या ठिकाणी झाले. तत्कालीन स्काऊट मास्टर नागोराव टिप्पलवाड यांनी त्यांना स्काऊट गाईड चळवळीचे धडे शिकवले याच कालावधीत सन 1997 या वर्षी तत्कालीन राज्यपाल महामहीम पी.सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते केंद्रे यांना राज्यपाल पुरस्कार प्राप्त झाला..
तत्कालीन पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते केंद्रे यांना पंतप्रधान ढाल पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले ते एवढ्यावर थांबले नाहीत पुढे त्यांनी विद्यार्थीदशेतील स्काऊट गाईड चळवळीतील अतिशय खडतड परीक्षा पात्र केली व नोव्हेंबर 1999 या वर्षी तत्कालीन राष्ट्रपती महामही के. आर. नारायणन यांच्या शुभहस्ते राष्ट्रपती भवनामध्ये त्यांना राष्ट्रपती स्काऊट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
योगायोगाने त्यांना स्काऊट गाईड चळवळीतच नोकरी करण्याची नामी संधी सन 2008 यावर्षी मिळाली व त्यांनी या चळवळीतील सर्वोच्च म्हणजेच डॉक्टरेट इन् स्टाऊटिंग संबोधल्या जाणाऱ्या लीडर ट्रेनर या प्रशिक्षणात यश प्राप्त केले..
चळवळीतील प्राथमिक प्रशिक्षण त्यांनी 2008 मध्ये पूर्ण केले, त्यानंतरचे प्रगत प्रशिक्षण सन 2009 यावर्षी पूर्ण केले, आवश्यक असणारे स्वाध्याय प्रशिक्षण 2011 या वर्षी पूर्ण केले, व राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र पंचमढी या ठिकाणी सन 2013 या वर्षी हिमालयवूड बज प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतरचे प्री. ए. एल. टी. हे प्रशिक्षण त्यांनी सन 2015 यावर्षी पूर्ण केले. असिस्टंट लीडर ट्रेनिंग हे प्रशिक्षण त्यांनी सन 2018 यावर्षी पूर्ण केले व नुकतेच लीडर ट्रेनर हे प्रशिक्षण पूर्ण केले. रिजनल लेवल ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स वेस्टर्न रिजन च्या माध्यमातून सर्फ स्मार्ट, फ्री बीइंग मी, स्टॉप द वोईलेंच, मेसेंजर ऑफ पीस, strategic प्लॅनिंग वर्कशॉप, नॅशनल लेवल मॅपिंग कम स्टार गेजिंग कोर्स, नॅशनल लेवल हॅंडीक्राफ्ट ट्रेनिंग, योगा ट्रेनिंग कोर्स, स्टेट लेवल फर्स्ट एड, मॅपिंग कोर्स यासारख्या बऱ्याच नॅशनल इव्हेंट मध्ये त्यांनी यशस्वी सहभाग नोंदविला. याच सोबत आज तागायत त्यांनी सहा नॅशनल जांबुरी मध्ये व तसेच तीन स्टेट लेवल राज्य मेळाव्यामध्ये यशस्वी सहभाग नोंदवून आपल्या कार्याचा ठसा नोंदवला, यामध्ये थर्ड सार्क अँड थर्ट्टींत नॅशनल जांबोरी खुर्द रोड ओरिसा, नॅशनल जांबोरी शंकरापल्ली हैदराबाद, नॅशनल जांबोरी अडकन हेली म्हैसूर, नॅशनल जांबोरी पाली राजस्थान, राज्य मेळावा अहमदनगर, राज्य मेळावा सिंहगड पुणे यांचा समावेश होता..
लातूर येथे जिल्हा संघटन आयुक्त या पदावर कार्यरत असताना त्यांनी सलग दहा जिल्हा मेळावा घेण्याचा विक्रम नोंदविला. हे कार्य करत असताना लातूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी राज्यपाल पुरस्कार व तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करून दिले व हजारो शिक्षकांना देखील प्रशिक्षित केले. त्यांच्या कार्यकाळात लातूर जिल्ह्यातील स्काऊट गाईड चळवळीची गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ झाली.
सध्या ते उपसंचालक कार्यालय क्रीडा विभाग लातूर या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत.. त्यांच्या या यशाबद्दल स्काऊट गाईड चळवळीत तील सिल्वर एलिफंट पुरस्कार प्राप्त माजी क्रीडामंत्री दिलीपराव देशमुख, विद्यमान क्रीडामंत्री संजय बनसोडे, लातूर भारत स्काऊट आणि गाईड संस्थेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गोपाळराव पाटील, लातूर भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्थेचे उपाध्यक्ष आमदार विक्रम काळे, महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड राज्यसंस्थेचे माजी राज्य मुख्य आयुक्त भाईदास ईश्वर नगराळे, दलित मित्र डी.बी. लोहारे गुरुजी, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, माझी जिल्हा परिषद सदस्य अशोक केंद्रे, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष वसंतराव पाटील, महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड राज्यसंस्थेच्या राज्यचिटणीस श्रीमती सारिका बांगडकर, माजी राज्यचिटणीस नागेश मोटे ,लातूर विभागीय क्रीडा कार्यालयाचे क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, लातूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, क्रीडा अधिकारी जयराज मुंडे, कृष्णा केंद्रे, दत्ता गडपल्लेवार, श्रीमती सारिका काळे, सुरेंद्र कराड, श्री लटके, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, चिटणीस बजरंग चोले, तानाजी पाटील, गोविंद गुडसुरे, राजकुमार पाटील, चंद्रकांत साळुंखे, श्रीमती दीपाताई गीते, श्रीमती शालिनीताई राचमाले, श्रीमती शाहीन पठाण, रामलिंग मुळे, लातूरचे स्काऊट गाईड जिल्हा संघटक डॉक्टर शंकर चामे, रमाकांत गरड, शरद हुडगे, मदन धुमाळ, युवराज माने, सौदागर सर, संतोष गुरव, धोंडीराम पाटील, सुनील स्वामी, राजेंद्र जाधव, सोमनाथ भातांगले आदींनी त्यांचे अभिनंदन केले.