पुणे शहर होमगार्ड ला अखेर समादेशक मिळाले
पुणे (प्रतिनिधी) : पुणे साप्रस होमगार्ड ला अखेर वाली मिळाला बराच काळ होमगार्ड पुणे शहर पथकाचे शहर समादेशक अधिकारी हे पद खुप दिवसापासुन रिक्त राहिले होते. आज खुप दिवसांतुन पुणे शहर समादेशक अधिकारी म्हणुन श्री. गोविंद पांडुरंग माने यांची पुणे शहर समादेशक म्हणुन नियुक्ती करण्यात आली. व सहाय्यक समादेशक म्हणुन श्री. जालिंदर गंधाडे यांची हि नियुक्ती करण्यात आली. आता होमगार्ड जवानांच्या जे काही समस्या आहेत अडचणी आहेत त्या दुर होण्याची एक आशा या सर्व जवानांच्या मनात आज दिसुन येत आहे. आज होमगार्ड जवान पोलीसांच्या खांद्याला खांदा लावुन प्रामाणिक आपली ड्युटी करत असतो. तरी देखिल त्यांचे मानधन वेळेवर मिळत नाही.काही होमगार्ड जवान हे फक्त या ड्युटीवर आवलंबुन असतात आणि जर त्यांना त्यांचे मानधन वेळेवर नाही मिळाले तर त्यांनी आपला उदर निर्वाह कसा चालवावा .पण आज त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद दिसुन येत होता.
आज पोलीस फ्लॅश न्युज चे उपसंपादक रफिक शेख पुणे शहर यांनी पुणे शहर होमगार्ड ऑफीस साप्रस येथे सदिच्छा भेट दिली. व श्री. गोविंद पांडुरंग माने शहर समादेशक व सहाय्यक समादेशक श्री. जालिंदर गंधाडे यांना शुभेच्छा दिल्या.
व यापुढे सर्व होमगार्ड जवानांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. या वेळेला पोलीस फ्लॅश न्युज चे उपसंपादक श्री. रफिक शेख .( पुणे शहर ) गृहरक्षक दलाचे राम लहाडे. .एस.व्ही.लगड. सुनिल भोसले. हजारे . व सर्व पदाधिकारी व होमगार्ड जवान उपस्थित होते.