अहमदपूर-चाकूर विधानसभा एकूण नामनिर्देशनपत्र 60 दाखल, 58 वैध तर 02 अवैध, वैधरित्या 42 उमेदवार रिंगणात
अहमदपूर ( गोविंद काळे)ः अहमदपूर-चाकूर विधानसभा एकूण 60 नामनिर्देशन दाखल झाले ओहत त्यापैकी 58 वैध ठरले असुन 02 अवैध ठरले आहेत. एकुण 42 वैधरित्या उमेदवार रिंगणात आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदपूर-चाकूर विधानसभा एकूण 60 नामनिर्देशन दाखल झाले ओहत त्यापैकी 58 वैध ठरले असुन 1.ज्योतिराम उर्फ गुणवंत जनकराज पाटील यांचा एकच अर्ज प्राप्त होता तो अवैध झाला आहे तर 2 अबोली विनायकराव जाधव पाटील यांचे दोन पैकी एक अर्ज अवैध एक वैध असे 02 अवैध ठरले आहेत. एकुण 42 वैधरित्या उमेदवार रिंगणात आहेत.
महाराष्ट्राच्या 15 व्या विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवार (दि.22) पासून सुरू झाली असून अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच दि. 22 ऑक्टोबर 2024 रोजी 5 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असुन दि. 23 ऑक्टोबर 2024 रोजी एक उमेदवारानी अर्ज दाखल केला होता. तर 24 ऑक्टोबर 2024 रोजी 09 अर्ज दाखल झाले होते तर आज दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी 03 अर्ज दाखल झाले असुन आजपर्यंत उमेदवारांचे 18 नामनिदेर्शन फॉर्म दाखल झाले आहेत.
दि 22 ऑक्टोबर 2024 रोजी 1. वागलगावे रावसाहेब निवृत्तीराव रा. राचन्नावाडी ता चाकुर पक्ष अपक्ष 2.जाधव विनायक सोनबा रा. सावरगाव रोकडा ता अहमदपूर पक्ष राष्ट्रीय मराठा पार्टी जात मातंग 3. जाधव गणेश दौलतराव रा तेलगाव ता अहमदपूर पक्ष अपक्ष 4. माधव रंगनाथ जाधव रा खंडाळी ता. अहमदपूर पक्ष अपक्ष 5. तिडोळे बालाजी लिंबाजी रा हासर्णी ता अहमदपूर पक्ष अपक्ष आदी पाच जणांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी तहसील कार्यालय अहमदपूर येथे दाखल केले असुन आजपर्यंत एकुण सहा नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत.
दिनांक 23 ऑक्टोबर 2024 रोजी वागलगावे रावसाहेब निवृत्तीराव -बहुजन विकास आघाडी यांचा एक अर्ज दाखल झाला होता.
दि. 24 ऑक्टोबर 2024 रोजी बाबासाहेब मोहनराव पाटील, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, माधव रंगनाथ जाधव-अपक्ष, जाधव पाटील विनायकराव किशनराव-नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, जाधव पाटील विनायकराव किशनराव – अपक्ष, अबोली विनायकराव जाधव पाटील – अपक्ष, अबोली विनायकराव जाधव पाटील – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, चंद्रशेखर चंद्रभान तांदळे – अपक्ष, बब्रुवान रामकृष्ण खंदाडे- अपक्ष, अविनाश बाळासाहेब जाधव – अपक्ष एकुण 09 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत. दि. 25 ऑक्टोबर 2024 रोजी पुंडलीक विठ्ठल कदम – अपक्ष, बालाजी रामचंद्र पाटील-अपक्ष, उत्तम चंद्रकांत वाघ – अपक्ष असे एकुण 3 उमेदवारी अर्ज दाखल झाले असुन दि. 26 व 27 ऑक्टोबर 2024 रोजी शासकीय सुट्टी असल्याने एकही अर्ज दाखल झाला नाही.
दि. 28 ऑक्टोबर 2024 रोजी तांदळे चंद्रशेखर चंद्रभान – अपक्ष, जाधव पाटील विनायकराव किशनराव – नॅशनेलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार गट, दस्तगीर जब्बार शेख – अपक्ष, धिरज मधुकर कांबळे – सैनिक समाज पार्टी, बालाजी देविदास पुरी- अपक्ष, बाबासाहेब मोहनराव पाटील – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, नरसिंह उद्धवराव भिकाने – महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उत्तम चंद्रकांत वाघ – अपक्ष, गणेश नामदेवराव हाके-अपक्ष, गोविंदराव बापूराव पाटील शेळके – अपक्ष, रोहिदास माधवराव कदम – अपक्ष, उत्कर्ष उत्तमकुमार वाघ – अपक्ष, उत्कर्ष उत्तमकुमार वाघ – अपक्ष असे एकुण 08 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर आज दि. 29 ऑक्टोबर 2024 रोजी लक्ष्मीकांत किशोर पाटील – अपक्ष, रियाज अहेमद निसारहेमद सिद्धीकी – जनहीत लोकशाही पार्टी, रमेश श्रीरंगराव गायकवाड – बहुजन समाज पार्टी, शंतनु दिनकर कदम – अपक्ष, रेखा दयानंद पाटील-अपक्ष, विजयकुमार श्रीपतराव बोडके – अपक्ष, माणिक रंगनाथ जाधव – अपक्ष, बालाजी रामचंद्र पाटील – अपक्ष, गणेश नामदेवराव हाके – जनसुराज्य शक्ती पार्टी, देवानंद मुरलीधर मुळे -अपक्ष, देवानंद मुरलीधर मुळे – अपक्ष, गिरजप्पा काशिनाथ बैकरे – महाराष्ट्र विकास आघाडी, माधव रंगनाथ जाधव – अपक्ष, कैलास शिवाजी पवार – अपक्ष, वागलगावे रावसाहेब निवृत्तीराव – अपक्ष, जयराम श्रीराम पवार – अपक्ष, शहाजी अंकुशराव शिंदे – अपक्ष, शहाजी अंकुशराव शिंदे – अपक्ष, विशाल शिवहर बाळकुंदे – अपक्ष, रियाज अहेमद निसारहेमद सिद्धीकी – अपक्ष, भारत नागोराव चामे – अपक्ष, मनोहर विठ्ठल गायकवाड – अपक्ष, दयानंद दामोदर काळे – अपक्ष, अॅड. एकनाथ ज्ञानोबा गजिले – अपक्ष, अॅड. एकनाथ ज्ञानोबा गजिले – अपक्ष, दिपक अर्जुन कांबळे – बहुजन मुक्ती पार्टी, महादेव नागोराव भंडारे – अपक्ष, संजीव राम चन्नागीरे – अपक्ष, ज्योतिराम ऊर्फ गुणवंत जनकराज पाटील – अपक्ष असे एकुण 21 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
असे एकुण आजतागायत पर्यंत 43 झाले आहेत. अर्ज भरण्यासाठी सर्वसाधारण उमेदवारांसाठी अनामत रक्कम दहा हजार रुपये इतकी आहे. तर एस.सी, एस.टी. प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम पाच हजार रुपये इतकी आहे.सदरील निवडुक कार्य अत्यंत चोखपणे निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार सहा. निवडणुक निर्णय अधिकारी उज्वला पांगरकर, नरसिंग जाधव तसेच नियुक्त कर्मचारी यांच्या वतीने केले जात आहे.