विधानसभा निवडणुक पार्श्वभूमीवर अहमदपूर शहरात पोलीसांचे पथसंचलन

0
विधानसभा निवडणुक पार्श्वभूमीवर अहमदपूर शहरात पोलीसांचे पथसंचलन

अहमदपूर ( गोविंद काळे ) : शहरात विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन अहमदपूर यांच्या वतीने दि ३० ऑक्टोबर रोजी शहरातील पोलीस स्टेशन , हिना लॉज , आझाद चौक, मेन रोड , थोडगा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसवेश्वर चौक आदी ठिकाणी पथसंचलन करण्यात आले
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या असुन पुढील काळात राजकीय पक्षांकडून शक्ती प्रदर्शन आणि प्रचाराला वेग येणार आहे या पार्श्वभूमीवर राजकीय नेते मंडळींकडून आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी देखील झाडणार आहेत. या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा हा सोहळा शांततेच्या मार्गाने यशस्वी करण्यासाठी कायदा व सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे या उद्देशाने पोलिसांचे पथसंचलन करण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या अनुषंगाने दि. ३० बुधवार रोजी दुपारी अहमदपूर येथे पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशावरून उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बि. डि भुसनुर सहाय्यक पोलीस निरीक्षक आईलवार, पोलिस उपनिरीक्षक श्रीमंगल, पोहेकॉ केलास चौधरी पोकॉ सुकेश केंद्रे पोअ विशाल मुंडे आदी सह पोलिसांनी शहरातील पोलीस स्टेशन , हिना लॉज , आझाद चौक, मेन रोड , थोडगा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसवेश्वर चौक आदी ठिकाणी पथसंचलन केले. यात ३ अधिकारी व २० अंमलदार तसेच बीएसएफ चे २ अधिकारी उपस्थित होते

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *