शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत मोठे यश,

0
शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत मोठे यश,

5 खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र . एकूण 37 पदकांची केली कमाई

अहमदपूर ( गोविंद काळे ) दिनांक 23 ऑक्टोंबर ते 28ऑक्टोबर 2024 दरम्यान विभागीय क्रीडा संकुल , छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी र्स्पर्धेत – 14 वर्षीय वयोगटात इपी वैयक्तिक प्रकारात ऋषभ गुणालेने सुवर्णपदक तर स्नेहा कश्यपने रौप्य पदक पटकावले . -17 वर्षीय वयोगटात इपी वैयक्तिक प्रकारात साईप्रसाद जंगवाडने सुवर्णपदक , जान्हवी जाधवने सुवर्णपदक व रोहिणी पाटीलने रौप्य पदक प्राप्त केले . त्यांची जम्मु कश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .

 सांघीक प्रकारात 14 वर्ष वयोगटात  मुलींच्या इप्पी संघाने सुवर्णपदक पटकावले त्यात स्नेहा , साक्षी, माही, स्मिता     यांचा समावेश  होता .    

17 वर्षीय वयोगटांमध्ये मुलांच्या सांघिक प्रकारात सेबर मध्ये सुवर्णपदक , फॉईल मध्ये रौप्य पदक , इपी मध्ये कांस्य पदक पटकावले .यामध्ये साईप्रसाद ,हर्षवर्धन , आशिष , सुजल , यशराज , अर्जुन यांचा समावेश होता .मुलींच्या सांघिक प्रकारात सेबर मध्ये रौप्य पदक , इप्पी मध्ये कांस्य पदक पटकावले . यामध्ये रोहिणी , जान्हवी , सिद्धी , नंदश्री , नंदिनी, रोशनी यांचा समावेश होता . 19 वर्षीय मुलींच्या सांघिक प्रकारात इपी प्रकारात कांस्यपदक ,फॉईल प्रकारात कांस्यपदक प्राप्त केले . यामध्ये वैभवी ,दिव्यांका ,आदिती , साक्षी ,आस्मीता यांचा समावेश होता .
या सर्व खेळाडूंना छत्रपती पुरस्कार प्राप्त दत्ता गलाले , वजिरोद्दीन काझी , मोसीन शेख, आकाश बनसोडे , रोहित गलाले यांचे मार्गदर्शन लाभले .
या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार प्राप्त गणपतरावजी माने , तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अभिजीत मोरे , प्रशांतजी माने, बी.आर.काबरा ,डॉ. सुनिल चलवदे , ज्ञानोबा भोसले ,कुलदीप भैया हाके, वैभव कज्जेवाड , यांनी अभिनंदन केले .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *