डॉ. बब्रुवान मोरे यांची विभागीय समन्वयक पदी निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने विभागीय समन्वयक पदी नुकतीच निवड केली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रात नावलौकिक मिळविले आहे. या कार्याची दखल घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांनी डॉ. बब्रुवान मोरे यांची विभागीय समन्वयक पदी निवड केली. डॉ. मोरे यांच्या कार्यक्षेत्रात महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर, महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर, महात्मा फुले महाविद्यालय किनगाव, कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालय हाडोळती व स्वामी विवेकानंद महाविद्यालय शिरूर ताजबंद आदी महाविद्यालयाचा समावेश आहे.
डॉ. बब्रुवान मोरे यांची विभागीय समन्वयपदी निवड झाल्याबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, उपाध्यक्ष माधवराव पाटील, सचिव पी. टी. शिंदे, सहसचिव हिरागीर गिरी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे, माजी कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर, माजी कार्यक्रमाधिकारी प्रो. डॉ. अनिल मुंढे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी आदींनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.