प्रस्थापिताविरुद्ध परिवर्तन घडवण्यासाठी मी माझी उमेदवारी मागे घेत आहे – मा आ बब्रुवान खंदाडे
अहमदपूर ( गोविंद काळे ) : मागील अनेक वर्षापासून अहमदपूर विधानसभेवर प्रस्थापित लोकांनी जनतेची दिशाभूल करून निवडणुका जिंकल्या परंतु सद्यस्थितीत लोकांचा कल पाहता मतदार संघात परिवर्तनाची लाट दिसून येत आहे मी या निवडणूक प्रचार दरम्यान जवळपास 80 ते 90 गावांमध्ये प्रचारासाठी गेलो असता तेथील समाजबांधवांच्या, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम तयार झाला होता. की आम्ही कोणाबरोबर रहावे. वेळोवेळी माझ्याकडे कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडल्या व त्यांच्या भावना लक्षात घेऊन मी माझा उमेदवारी अर्ज माघार घेऊन जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गणेश हाके यांना पाठिंबा जाहीर करत असल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
मा आ बब्रुवान खंदाडे यांचा जनसुराज्य शक्ती पक्षाला बिनशर्त पाठिंबा – गणेश हाके
मतदारसंघांमध्ये प्रचार द्वारे काढत असताना ज्या गावी जाईल त्या गावी बहुजन समाजामधून दोघांपैकी एक उमेदवार असावा अशी सर्व जनतेची मागणी होती. त्या सर्व जनतेच्या मागणीच्या अनुषंगाने माजी आमदार खंदाडे साहेबांना विनंती केली. तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनयजी कोरे यांनी मा आ खंदाडे साहेबांना फोनवरून सांगितले की दोघेही पराभव स्वीकारण्यापेक्षा तुम्ही एक वेळ माघार घ्या मी तुमच्या सर्व कार्यकर्त्याची योग्य ठिकाणी वर्णी लावेल असा शब्द दिल्यामुळे माजी आमदार खंदाडे साहेबांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेण्याचे ठरवले आहे.
माजी आमदार खंदाडे साहेबांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे ठरवल्याने मतदारसंघांमध्ये बहुजन समाजातील सर्व जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले असून आता बहुजनाचा आमदार अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघास मिळणार असे बोलले जात आहे.