विधानसभेची उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २२ जणांचे उमेदवारी अर्ज मागे ; २० उमेदवार रिंगणात

0
विधानसभेची उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २२ जणांचे उमेदवारी अर्ज मागे ; २० उमेदवार रिंगणात

अहमदपूर ( गोविंद काळे ) अहमदपूर- चाकुर विधानसभा मतदार संघात ४२ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडून वैद्य ठरवण्यात आले होते दि ०३ नोंव्हेंबर रोजी ०१ तर दि ०४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २१ अश्या एकूण २२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असुन महायुती व महाविकास आघाडी तसेच इतर पक्षासह अपक्ष असे २० उमेदवार आता प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत

राज्यात येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडी यांची आपापल्या मित्र पक्षां सोबत खलबतं सुरू होती. जागा वाटपा नंतरही गेले अनेक दिवस वेगवेगळ्या मतदार संघांमध्ये पेच कायम होता. अहमदपूर- चाकुर विधानसभा मतदार संघात अनेक इच्छूक उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केल्याचं समोर आलं होतं. दि ०३ नोंव्हेंबर रोजी ०१ अर्ज तर दि ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी २१ अश्या एकूण २२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असले तरी, अजूनही भाजपाचे गणेश हाके यांनी जनसुराज्य शक्ती कडून तर बालाजी पाटील चाकुरकर यांनी अपक्ष म्हणुन बंडखोरी करीत ते आपल्या भूमिकांवर कायम असुन त्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले नाहीत व ते आता निवडणुकीच्या प्रत्यक्ष रिंगणात उतरले आहेत यामुळे अहमदपूर -चाकुर मतदार संघात बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे

प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार : –

१.बाबासाहेब मोहनराव पाटील
नॅशनललिस्ट काँग्रेस पार्टी
२.जाधव पाटील विनायकराव किशनराव
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
३.डॉ. नरसिंह उद्धवराव भिकाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना
४.अॅड. गायकवाड रमेश श्रीरंगराव
बहुजन समाज पार्टी
५. वागलगावे रावसाहेब निवृत्ती राव
बहुजन विकास आघाडी
६.जाधव विनायक सोनबा
राष्ट्रीय मराठा पार्टी
७.धीरज मधुकर कांबळे
सैनिक समाज पार्टी
८.गणेश नामदेवराव हाके
जनसुराज्य शक्ती
९.रियाज अहमद निसार अहमद सिद्दिकी
जनहित लोकशाही पार्टी
१०.गिरजाप्पा काशिनाथ बैकरे
महाराष्ट्रविकास आघाडी
११.जाधव गणेश दौलतराव अपक्ष
१२.माधव रंगनाथ जाधव अपक्ष
१३.बालाजी रामचंद्र पाटील अपक्ष
१४.उत्तम चंद्रकांत वाघ अपक्ष
१५.कदम पुंडलिक विठ्ठल अपक्ष
१६.विशाल शिवहर बालकुंदे अपक्ष
१७.अॅड एकनाथ ज्ञानोबा गंजले अपक्ष
१८.दीपक अर्जुन कांबळे अपक्ष
१९.श्री महादेव नागोरावभंडारे अपक्ष
२०. संजीव राम चन्नागिरे अपक्ष

उमेदवारी अर्ज मागे घेतलेले उमेदवार : –

१.अविनाश बाळासाहेब जाधव अहमदपूर
२. बब्रुवान रामकृष्ण खंदाडे सताळा खुर्द तालुका
अहमदपूर,
३.तांदळे चंद्रशेखर बापू चंद्रभान नळेगाव
तालुका चाकूर
४.तिडोळे बालाजी लिंबाजी हासरणी तालुका अहमदपूर
५..अबोली विनायकराव जाधव पाटील काळेगाव तालुका अहमदपूर
६.दस्तगीर जब्बार साब शेख शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर
७.बालाजी देवदास पुरी महाराज मोघा तालुका अहमदपूर
८.प्रा. गोविंदराव बापूराव पाटील शेळके अहमदपूर, ९.रोहिदास माधवराव कदम तांबट सांगवी तालुका अहमदपूर,
१०.उत्कर्ष उत्तमराव वाघ हनुमंतवाडी तालुका चाकूर,
११.लक्ष्मीकांत किशोर पाटील उदगीर तालुका उदगीर,
१२. शंतनू दिनकर कदम शिंदगी बुद्रुक तालुका अहमदपूर,
१३. रेखा दयानंद पाटील तिव घाळ तालुका चाकूर ,
१४.बोडके पाटील विजयकुमार श्रीपतराव सावरगाव रोकडा तालुका अहमदपूर
१५.माणिक रंगनाथ जाधव खंडाळी तालुका अहमदपूर
१६. देवानंद मुरलीधर मुळे सिंदगी बुद्रुक तालुका अहमदपूर
१७. कैलास शिवाजी पवार हाडोळती तालुका अहमदपूर
१८.जयराम श्रीराम पवार हंगरगा तालुका अहमदपूर १९.शहाजी अंकुशराव शिंदे मुक्काम तिवघाळ तालुका चाकूर
२०.भारत नागोराव चामे अहमदपूर ,
२१. मनोहर विठ्ठल गायकवाड चिखली तालुका अहमदपूर,
२२.दयानंद रामदास दामोदर काळे खाडगाव रोड लातूर

दि ४ नोंव्हेंबर रोजी सकाळी अंतरवली सराटी येथुन मनोज दादा जरांगे यांनी जरांगे समर्थक मराठा उमेदवारांनी आप आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत अशी विनंती केली होती या विनंतीला मान देऊन अहमदपूर -चाकुर मतदार संघातील सर्व मराठा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *