अहमदपूर ( गोविंद काळे ) अहमदपूर- चाकूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वागीण विकासासाठी आमच्या परीवाराने कायमच अविरत प्रयत्न केले आहे. विकास ही अविरत चालणारी प्रक्रिया असून विकासाच्या योजना पासून कोणीच वंचित राहता कामा नये. माळेगाव, जवळगा, कोकणगा, मांडणी, वळसंगी, चोबळी, माकणी, द्वारका नगर, गादेवाडी, वायगाव व कुमठा बु. भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महायुतीला आशीर्वाद द्यावेत असे आवाहन महायुतीचे उमेदवार आ. बाबासाहेब पाटील यांनी केले.
अहमदपूर- चाकूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. बाबासाहेब पाटील यांनी सोमवारी माळेगाव, जवळगा, कोकणगा, मांडणी, वळसंगी, चोबळी, माकणी, द्वारका नगर, गादेवाडी, वायगाव व कुमठा बु. सर्कल मधील या गावचा दौरा करून मतदारांशी संवाद साधला. दिवसभराच्या दौऱ्याचा समारोप कुमठा.बु येथे जाहीर सभा घेवून करण्यात आला. यावेळी मतदारांनी मोठी गर्दी केली होती यात महिलांचा सहभाग लक्षणीय दिसून आला. ठीकठिकांणच्या प्रचार दौऱ्यात आणि कुमठा बु. येथील जाहीर सभेस कृ.उ.बा. सभापती मंचकराव पाटील, शिवानंद तात्या हेंगणे, शिवाजीराव देशमुख, भाजपा शहराध्यक्ष सुशांत गुणाले, संचालक शिवाजीराव खांडेकर, किरण पाटील, संचालक प्रतिनिधी नारायण नागमोडे, युवा जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, अविनाश देशमुख, चेअरमन राजकुमार सोमवंशी, दयानंद पाटील, सचिन पाटील, श्याम भाऊ भगत, शैलेश जाधव, विकास बोबडे, श्रीकांत मजगे, तानाजी राजे, हरिबा मामा आडाव, तानाजी मोरे, विनायक शिंदे, अशोकराव सोनकांबळे, श्याम भगत, अमोल भगनुरे, चंद्रकांत गंगथडे, डॉ. सादिक शेख, विकास बोबडे, अतुल पाटील रुई, गंगाधरराव ताडम, कोंडीबा पडोळे, बाळासाहेब बेडदे, माधव सरवदे, गंगाधराव ताउमे, यांच्यासह वायगाव येथील चेअरमन दिनानाथ राचमाळे, सरपंच ज्ञानेश्वर पाटील, बाबासाहेब हाळीकर, श्रीकांतराव मजगे, विनोद पाटील, देवीसद कांबळे, ज्ञानोबा बडगिरे, शिवाजी तेलंगे, नबीसाब शेख, रविंद बालवाड, कमलाकर राचमाळे, रामू पाटे, सिद्धअप्पा मजगे, बाबू राचमाळे, व्यंकट यलमटे, बाळू मजगे, दयानंद मजगे, मुकुंद पाटील, अलीम शेख, सुरज यलमटे, नागनाथ कानगुले, नारायण कानगुले, विठ्ठल यलमटे, प्रतिक गुंडरे यांच्यासह इतर अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
महायुती शासनाने सुरू केलेल्या विविध लोककल्याणकारी योजनाची सविस्तरपणे माहिती देऊन या योजनेचा लाभ देताना कधीच जातीपातीचा विचार केला नाही. जो गरजू आहे जो पात्र आहे अशा सर्वाना विविध योजनेचा लाभ मिळत असल्याचे सांगून आ. बाबासाहेब पाटील म्हणाले की विरोधकांनी फक्त विकासाच्या गप्पा केल्या तर खरा विकास काय असतो हे आम्ही मतदारसंघातील जनतेला दाखवला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून विरोधकांनी मतदारसंघातील जनतेच्या अडीअडचणी सोडविल्या नाहीत, भेटत सुद्धा नाहीत, विकासाची कामे तर केलीच नाही खऱ्या अर्थाने त्यांना मत मागण्याचाही नैतिक अधिकार नाही असे सांगून आ. पाटील म्हणाले की, गेल्या निवडणुकीत भ्रष्ट पैशाच्या जोरावर मतदार संघ विकत घेण्याचे केविलवाणा प्रयत्न केला गेला पण बहाद्दर मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. मतदार संघातील बहुतांश मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे भाग्य मला मिळाले. मंदिराच्या कामाबरोबरच बौद्ध विहार, शादीखाना व रस्ते मजबुतीकरण या लोकहिताच्या योजनांना मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिला.कुमठा.बु. परीसरातील गावागावात विकास कामांना गती देण्याचे काम केले असून येत्या काळात सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी आपण मला आशीर्वाद द्यावेत आणि महायुती शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेसह सर्वच जनहिताच्या योजना पुढील काळातही कायमपणे सुरू ठेवण्यासाठी महायुतीला विजयी करावे असेही त्यांनी बोलून दाखवले.