बहारदार नाट्यसंगीताचा ‘दिपसंध्या’ कार्यक्रम संपन्न

0
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न

उदगीर : (प्रतिनिधी) येथील संस्कार भारती समिती, उदगीर व मातृभूमी महाविद्यालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिपसंध्या’ हा नाट्य संगीतावर आधारलेला सांगितिक कार्यक्रम बहारदार नाट्यगीतांनी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी जयेंद्र कुलकर्णी, अंबाजोगाई, गोपाळ जोशी, उदगीर, केदार जोशी, उदगीर या गायकांनी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी नाट्यगीते सादर केली. यामध्ये नमन नटवरा विस्मयकारा, मर्मबंधातली ठेव ही, सोहम हर डमरू बाजे, दिन गेले भजनाविन सारे, देवाघरचे ज्ञात कुणाला, कधी भेटेल वनवासी नियोगी रामचंद्राला, घेई छंद मकरंद, दिव्य स्वातंत्र्य रवी, नारायणा रमारमणा, कर हा करी धरीला शुभांगी, काटा रुते कुणाला, छेडून गेले मधुर स्वरविमल, हे सुरांनो चंद्र व्हा, प्रिये पहा रात्रीचा समय सरून, वैकुंठीचा राया या नाट्यगीतांचा समावेश होता. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर या भैरवीने ‘दिपसंध्या’ कार्यक्रमाचा समारोप झाला. त्यांना तबल्यावर आकाश बडगे, उदगीर यांनी तर संवादिनीवर भालकी येथील विनायक चौधरी यांनी सुरेख साथसंगत केली. निवेदिका म्हणून सौ. अश्विनी देशमुख यांनी भूमिका पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कार भारती समिती उदगीरचे अध्यक्ष सतीश उस्तुरे, मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्य उषा कुलकर्णी, डॉ. संजय कुलकर्णी, प्रदीप पत्तेवार, डॉ. मुकेश कुलकर्णी, प्रसाद जालनापुरकर यांनी पुढाकार घेतला होता.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *