कूमठा सर्कलमध्ये आमदार बाबासाहेब पाटील यांची मुसंडी
अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील कूमठा बु परिसरातील गावांमध्ये जनसंवाद दौऱ्याची सांगता कुमठा बु. येथे जाहीर सभेमध्ये झाली लोकांचा प्रचंड प्रतिसाद पाहता आमदार बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर कुमठा सर्कलमध्ये मुसंडी मारली आहे.
सोमवारी कुमठा पंचायत समिती सर्कलमधील सय्यदपुर, बाबळदरा, शिवणखेड, कौडगाव, कामलवाडी,कुमठा बु. या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार गट ) व महायुतीचे उमेदवार आमदार बाबासाहेब मोहनराव पाटील हे जनसंवाद दौऱ्यानिमित्त लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर त्यांना लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तसेच लाडकी बहिण योजनेमुळे महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे. सोमवारच्या जनसंवाद दौऱ्याची सांगता सभा कूमठा बु येथे पार पडली. या सभेत आमदार बाबासाहेब पाटील यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकासकामांची यादी लोकांना सांगितली. तसेच विरोधकाप्रमाणे त्यांचा फक्त निवडणुकी पुरता लोकांशी संबंध नसून ते लोकांच्या सुखदुःखांमध्ये नेहमीच सामील असतात. कारखाना, बँक, पतसंस्था व शिक्षणसंस्था, दुध डेअरी काढून अनेक तरुणांच्या हाताला काम दिले आहे. असे विरोधकांनी कुठले काम केले आहे आणि किती तरुणांना कामाला लावले हे सांगावे असा प्रतिसवाल त्यांनी केला. मी आमदार या पदासाठी योग्य आहे असे वाटत असेल तरच मला मतदान द्या असे आवाहन केले. माझी ही शेवटची निवडणूक आहे असे खोटे सांगून मी कधी निवडणूक लढवणार नाही. आमदार असून मंत्र्याच्या बरोबरीने विकास कामे केली म्हणून हक्काने मी मतदान मागेल असे निक्षून सांगितले. यावेळी चांदपाशा गफूर बागवान प्रदेश सरचिटणीस नियुक्तीपत्र देण्यात आले. दिनेश भोसले, सद्दाम बागवान व मित्रपरिवार तसेच आनंदवाडी येथील अमोल पाटील व मित्रपरिवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच अनिल कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून सभापती मंचकराव पाटील, शिवाजीराव देशमुख, शिवानंद तात्या हेंगणे, टी पी कांबळे, निवृत्ती कांबळे, सुशांत गुणाले, शिवाजीराव खांडेकर रहीमखां पठाण,गंगाधर ताडमे, प्रशांत भोसले,बाळासाहेब बेडदे, श्याम भगत, शैलेश जाधव,परमेश्वर तीरकमटे, अनिल यादव पाटील,शरद पवार, अमोल पाटील, हे उपस्थित होते. तर गावातील बळीरामजी भिंगोले, अंकुशराव कानवटे, श्यामराव टीकोरे,बालाजी जाधव, बालाजी माळवदे, सुशील बयास, स्वरूप गुंजाटे, अजित शेळके, दिलीप ढेले बाबुराव पाटील, शिवाजी शेळके, जयपाल सिंह बयास, दशरथ तिगोटे, पांडुरंग तिगोटे, प्रा. अतुल जाधव, वसंत जाधव, प्रवीण भिंगोले, हनुमंत जाधव, दिलीप भोसले, कृष्णाराज भोसले, अक्षय गुळवे, सुधीर भोसले, ज्ञानेश्वर जाधव, कालिदास जाधव, बळीराम जाधव, बळीराम नेवाळे, साधू चव्हाण, संग्राम कांबळे, दिलीप कांबळे, अमोल तिगोटे, मुकेश तिगोटे, चंद्रकांत काळे, बालाजी मुंडकर, गणी मुंजेवार, अब्दुल गफूर देशमुख, सलीम बिद्रे व ग्रामस्थ उपस्थित होते.