आपले संविधान ठेवा त्याचा मान,लोकशाही बलवान करु चला.
( चिखली येथे स्वीप कला पथकाद्वारे मतदार जनजागृती )
अहमदपूर ( गोविंद काळे )
लातूर विधानसभा
सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ साठी चिखली गावातून २० नोव्हेंबर रोजी ७५% पेक्षा जास्त टक्केवारीने मतदान करुन आपल्या जिल्हात चिखली गावचे नाव उंचवावेत.यासाठी अहमदपूर तहसील कार्यालयाच्या वतीने स्वीप कला पथकाद्वारे विविध अभंगातून जनजागृती करण्यात आली.
सुजान नव मतदार तरुण बांधवांनी निवडणूकीच्या काळात आपल्या गावातील वृद्ध मतदार आज्जी-आजोबांचे मतदान करुन घ्यावेत असे मत पथकाने मांडले. अपंग मतदार व 85 वर्ष पुर्ण झालेल्या मतदार बांधवांना मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य निभवावेत असे आवाहन केले.
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूरचे तहसीलदार उज्वला पांगरकर व चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव,शिक्षणाधिकारी नागेश मापारी, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे ,दिलीप हैबतपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात जनजागृती करण्यात येत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीपचे सदस्य महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,नागनाथ स्वामी,बसवेश्वर थोटे,विवेकानंद मठपती,श्रीमती अर्चना माने,विवेकानंद भंडे,संभाजी यलपुरवाड,जयप्रकाश हाराळे,कपिल बिरादार,शिवशंकर पाटील यांच्या सह चिखली येथिल ग्रामसेवक कांबळे सुनिल, तलाठी शिंदे केरबा,
बाबुराव चाटे, शिवाजी गिरी,
निवृत्ती तांदळे,आश्विनी चाटे,
मैनाबाई गोपले,जना पंडित, मिरा गोपले,अनुसया गायकवाड, ललिता गायकवाड,तुकाराम गायकवाड,बालाजी चाटे गावातील प्रतिष्ठित नागरिक गावातील मतदार बंधू भगिणिनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थितीत होते.