अहमदपूर विधानसभेत महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार – माजी मंत्री अमित भैया देशमुख
महायुतीचे नेते भ्रष्टाचाराने तर महाविकास आघाडीचे नेते कर्तृत्वाने ओळखले जातात.
अहमदपूर ( गोविंद काळे ) आपणाला महाराष्ट्र घडवायचा आहे. महाराष्ट्राची अस्मिता प्राप्त करायची आहे.उमेदवार विनायकराव पाटील हे सामान्य माणसांचा बुलंद आवाज, पारदर्शक कारभार व कार्यकर्त्यांचा सन्मान वाढविण्याचे कार्य करणारे आहेत. महायुती ही भ्रष्टाचाराने बरबटली असून शेतकरी,नवतरुण नाराज असून यावेळी अहमदपूर विधानसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास माजी मंत्री अमित भैया देशमुख यांनी व्यक्त केला.
ते अहमदपूर- चाकूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विनायकराव पाटील यांच्या निजवंते नगर येथे घेण्यात आलेल्या जाहीर प्रचार सभेत बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री अमित भैया देशमुख म्हणाले की विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विनायकराव पाटील यांनी मतदार संघाचा कायापालट केला आहे. अहमदपूरचा विकास आता काय झाला आहे.काही बदल झालेला पहायला दिसत नाही. विकास कामे करण्यासाठी विनायकराव पाटील हे खूप सक्षम आहेत.या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या उसाला मांजरा साखर कारखान्याप्रमाणे भाव देऊ, या भागातील टिपर शिल्लक ठेवणार नाही,आपल्या भागातील उसाचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही खंबीर असल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, हरभरा या पिकाला शासनाला योग्य भाव व न्याय देता आला नसल्याची खंत व्यक्त केली.
देशमुख पुढे म्हणाले महायुती सरकारने खूप लूट केली असून महायुतीचे नेते, पुढारी भ्रष्टाचाराने ओळखले जातात तर महाविकास आघाडीचे नेते हे कर्तृत्वाने ओळखले जात असल्याचे उदाहरणासह पटवून सांगितले.सध्याचे फोडाफोडीचे राजकारण, आमदारांची बोली ,आमदार ,खासदार ची, पक्षाची खरेदी होते, खंजीर खुपसण्याचे काम चालू असल्याचे सांगून लोकशाहीला तोडण्याचे काम केले जात असून येत्या 20 नोव्हेंबरला तुतारी या चिन्हावर मतदान करून याचा हिशोब करण्याचे आवाहन माजी मंत्री अमित देशमुख यांनी केले.
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील म्हणाले की मतदार संघातील सर्व नागरिकांनी ही निवडणूक आपली स्वतःची समजून विजयी करण्यासाठी जिद्दीने, तळमळीने सर्वजण कामाला लागल्याचे सांगून आमच्या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे नेते ,पुढारी- ब्रह्मा ,विष्णू , महेश याप्रमाणे जिद्दीने प्रचाराचे काम करीत आहेत. विलासराव देशमुख यांच्या मदतीने आपल्या मतदारसंघात 42 साठवण तलाव तर 285 पाझर तलाव केल्यामुळे सध्या सर्वत्र हरितक्रांती झाली असल्याचे सांगून बालाघाट कारखाना सुरू केला पण तेव्हा उस नव्हता.पाटील म्हणाले की सध्या या भागात शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळत नाही, साखर कारखाना स्वस्तात खरेदी केल्याचे सांगून आम्ही निस्पृह भावनेने जनतेची सेवा, कामे करतो.आज पर्यंत आपला सेवक म्हणून मी काम केलं असून यापुढेही असेच सेवक बनवून जनतेची कामे करणार असल्याचे सांगून मतदारांनी आमिषाला बळी न पडता तुतारीला सर्वांनी मतदान करावे असे सांगून मी संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नसण्याचे शेवटी विनायकराव पाटील यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना उपनेते सुषमा अंधारे, माजी खासदार सुधाकर शृंगारे, माजी खासदार संजय जाधव परभणी ,खासदार शिवाजीराव काळगे ,डॉ. गणेश कदम , विलास पाटील चाकूरकर यांची समायोजित भाषणे झाली.
याप्रसंगी राम बेल्लाळे , आर.डी. शेळके ,सय्यद साजिद, ,निळकंठ मिरकले ,शिवाजी बैनगीरे, अमोल शेटे ,सुधीर गोरटे, बाबुभाई दाबकेवाले , निळकंठ पाटील, अनिल चव्हाण, सांब महाजन ,शिराजुद्दीन जहागीरदार, भारत सांगवीकर, नंदकुमार पवार, दत्तात्रेय हेंगणे ,संतोष रोडगे, संदीप चौधरी सह महाविकास आघाडीचे सर्व नेते ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.