गणेश हाके यांना मतदारसंघांमध्ये जनतेचा वाढता प्रतिसाद
अहमदपूर ( गोविंद काळे ) : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 च्या प्रचार दौऱ्यानिमित्त गाव भेटी करत असताना दिवसेंदिवस जनतेचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. सध्या मतदारसंघांमध्ये ओबीसी समाजाची मोठी लाट असून बहुजन समाजामधील उमेदवार हा आमदार व्हावा ही सामान्य जनतेची इच्छा आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे गणेश हाके यांच्या रूपाने मतदारसंघाला उच्चशिक्षित, शांत, संयमी, नेतृत्व लाभेल असे जनतेमध्ये बोलले जात आहे. प्रत्येक गावात प्रत्येक समाजामध्ये गणेश हाके नावाचा बोलबाला सध्या जोरदार चर्चेमध्ये आहे.
गणेश हाके यांना ज्याच्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली त्या त्या क्षेत्रामध्ये गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम गणेश हाके यांनी केले आहे. त्यामुळे ज्या गावात प्रचारानिमित्त गणेश हाके जातील त्या गावांमध्ये माणसाचा मेळा गणेश हाके यांच्या भोवती दिसत आहे. त्यामुळे विरोधकांची चांगली तारांबळ दिसून येत आहे. गावातल्या चावडीवर, शहरातील हॉटेलवर, चहा टपरी, पानपट्टी, केस कर्तनालय सर्वच ठिकाणी गणेश हाके नावाचा बोलबाला दिसून येत आहे. गणेश हाकेच आमदार होणार असं जनतेतून बोललं जात आहे.
गणेश हाके यांच्या समान न्याय सर्वांचा आदर व सन्मान करण्याचा तसेच अंगी असलेली नम्रता यामुळे लोकप्रिय होत आहेत.