गणेश हाके यांच्या प्रचार दौऱ्याला चाकूर तालुक्यामध्ये भरभरून प्रतिसाद
अहमदपूर ( गोविंद काळे ) : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गणेश हाके हे सध्या चाकूर तालुक्यामध्ये प्रचार दौरे करत आहेत.
मुळातच गेली दहा वर्षापासून गणेश हाके यांनी चाकूर तालुक्यामधील अगदी तळागाळाच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याचं काम केल्यामुळे चाकूर तालुक्यामध्ये गणेश हाके यांच्या प्रचार फेरी दरम्यान शेकडो नागरिक जमा होत आहेत यावेळी बऱ्याच नागरिकांशी चर्चा केली असता प्रस्थापित राज्यकर्त्यांना बदलण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यावेळेस बदल हवा अशी भावना जनसामान्य जनतेतून दिसून येत आहे त्यामुळे यावेळेस गणेश हाके हे आमदार होणार अशी भावना सर्व सामान्य जनतेच्या मनात आहे.
माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन गणेश हाके यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर गणेश हाके यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारामध्ये सामील झाले आहेत बहुजन समाजामध्ये यांना मनाचे स्थान आहे त्यामुळे या बहुजन समाजाच्या मतांचा फायदा गणेश हाके यांना होणार आहे. गणेश हाके हे बहुजन समाजातून येत असल्यामुळे गणेश हाके यांची ओबीसी, दलित, मुस्लिम तसेच बहुजन समाजाची ओढ ही गणेश हाके यांच्या बाजूने खंबीर पणे दिसून येत आहे.