अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघात अनेक विकासात्मक कामे करणार पत्रकार परिषदेत आ. बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघात अनेक विकासात्मक कामे करुन मतदार संघाचा चेहरा-मोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन पत्रकार परिषदेत आ. बाबासाहेब पाटील यांनी केले.
ते आज दि. 07 नोव्हेंबर 2024 रोजी दु. 3.00
वाजता आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मा.सभापती अॅड. टी. एन. कांबळे, राँ. का. चे तालुका अध्यक्ष शिवानंद तात्या हेंगणे, रिपाईचे बाबासाहेब कांबळे, नगर सेवक अभय मिरकले, रहिमखाँ पठाण, बाबुभाई रुईकर, आशिष तोगरे, अझहर बागवान, अरुण वाघंबर, अशोक सोनकांबळे यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. बाबासाहेब पाटील म्हणाले की, अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी गुरूवार 7 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. मागील काळामध्ये ट्रामा केअर सेंटर, दोन पशुवैद्यकीय रुग्णालय, नगरपालिकेची तीन मजली इमारतीसह 146 दुकाने असलेली नगरपालिकेचे संकुल, सांगवी राळगा उजना या आसपासच्या गावातील शेतकर्यांसाठी लिफ्ट सिंचन प्रकल्प, सिंदगी येथे एक हजार एकरावर उभारलेला नवीन तलाव, अहमदपूर चाकूर तालुक्यातील शाळांचे नूतनीकर, मन्याड नदीवरील आठ बांधा-याची उभारणी असे कोट्यावधीचे काम केले असून येणार्या काळात अहमदपूर शहरात 100 बेडचे नवीन रुग्णालय प्रस्तावित असून चाकूर शहरात ट्रामा केअर सेंटर उभारणार आहे.
अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आणि वैद्यकीय शिक्षणासह देशभरात कुठे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहीत करणार, मतदारसंघातील चाकूर तालुक्यातील शेळगाव, वाढवणा ते धर्माबाद सिमेंट रोड आणि सांगवी, उजना, गंगाहिप्परगा, खंडाळी अंधोरी, किनगाव व रेणापूर या शंभर किलोमीटर काँक्रीट रस्त्याचे बांधकामाचे काम करणार. अहमदपूर, चाकूर, नळेगाव, किनगाव मधील बस स्थानकाचा पुनर्विकास करून मतदारसंघात विद्यार्थ्यांसाठी इलेक्ट्रिक बसची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. अंतेश्वर धरणातून पाईपलाईन द्वारे मतदार संघातील 30 ते 32 गावातील शेतकर्यांना सिंचन आणि पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता करून आठ हजार हेक्टर वरील जमीन सिंचनाखाली आणणार तसेच शेतकर्यांना सौरऊर्जेद्वारे नियमित वीज देणार. मतदार संघातील शेतकर्यांचा आणि व्यापार्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी किनगाव मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती भवन, युवकांसाठी क्रीडा अकॅडमी, ओपन जिम स्थापन करणार आहे. मतदार संघातील महिला, स्वयंसेवी गटांना शासकीय योजनांशी जोडून महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्याचा यासह वृद्ध, अपंग आणि विधवांसाठी पेन्शन योजना द्वारे पेन्शन मिळून देणार आहे. असेही ते शेवटी म्हणाले. सदरील पत्रकार परिषदेचे सूत्रसंचलन व आभार आशिष तोगरे यांनी केले.