रोकडा सावरगाव सर्कल मधून गणेश हाके यांचे पारडे जड
अहमदपूर ( गोविंद काळे ) : अहमदपूर चाकूर विधानसभेचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गणेश हाके यांनी नुकताच रोकडा सावरगाव सर्कल मध्ये प्रचार दौरा आयोजित केला होता. या प्रचार दौऱ्यामध्ये हजारो नागरिकांशी संपर्क साधला असता या वेळेस मतदार संघामध्ये बदल घडणे आवश्यक आहे आणि हा बदल आम्ही घडवणारच असे मतदारातून बोलले जात आहे. या प्रचार दौऱ्यादरम्यान विविध सामाजिक संघटनांनी गणेश हाके यांना आपला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे.
यावेळी गणेशाचे यांनी सुद्धा मतदार संघातील शैक्षणिक, सामाजिक, महिलांची संरक्षण, शेतकरी हिताचे तसेच सर्व सामाजिक घटकांना सोबत घेऊन सर्वांचे हित लक्षात घेऊन मी काम करणार आहे त्यामुळे एक वेळेस मला संधी द्यावी अशी विनंती केली. उच्चशिक्षित असलेल्या गणेश हाके यांना मतदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याची कला गणेश हाके यांच्या अंगी असल्याने गोरगरीब जनतेचा उमेदवार म्हणून गणेश हाके यांना अधिकची पसंती ग्रामीण भागांमधून दिसून येत आहे.