लोकशाहीचा उत्सवात सर्वानी मतदानाचा हक्क बजावावा(स्वीप पथकाद्वारे हिप्पळगाव येथे जनजागृती )
अहमदपूर (गोविंद काळे) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ साठी अहमदपूर तालुक्यातील गुंजोटी येथे दि.५ रोजी सायंकाळी प्रबोधपर लोकगीतातून मतदार जनजागृती करण्यात आली.आपल्या गावातून १००% मतदान करण्यासाठी स्वीप पथकाने आवाहन केले.
मतदार बंधू-भगिणींना मतदानाचे महत्त्व पटवून देवून,लोकशाहीतील महा उत्सवात सहभाग नोंदवावेत. आपण शासनाच्या सर्व सोई सुविधा हक्काने उपभोगत आहोत.संविधानाने आपणास दिलेला मतदानाचा हक्क येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजी आपले कर्तव्य समजून पार पाडावे. देशाचे आदर्श भारतीय नागरीक होण्याचे कर्तव्य पार पाडून देशातील आदर्श नागरीक होण्यासाठी महाउत्सवात सहभाग नोंदवावेत.
या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूरचे तहसीलदार उज्वला पांगरकर व चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे ,दिलीप हैबतपुरे यांच्या आदेशानुसार मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम करण्यात येत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीपचे सदस्य महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,बस्वेश्वर थोटे,नागनाथ स्वामी,अर्चना माने,विवेकानंद भंडे,संभाजी यलपुरवाड,प्रमोद हुडगे,धनंजय नाकाडे,विवेकानंद मठपती,जयप्रकाश हाराळे यांच्यासह हिप्पळगाव येथिल
मतदार बंधू मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थितीत होते.