जिव्हाळा ग्रुप तर्फे दूध जनजागृती अभियान.
उदगीर. (एल.पी.उगीले) येथील जिव्हाळा ग्रुप तर्फे विश्वनाथराव माळेवाडीकर यांच्या अध्यक्षतेखाली, प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक, महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूरचे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. अनिल भिकाने तसेच जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष रमाकांत बनशेळकीकर,शंकरराव साबणे, शंकरराव केंद्रे, दशरथ शिंदे व देविदास नादरगे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या आवाहनानुसार दूध जनजागृती अभियान कार्यक्रम घेण्यात आला. जिव्हाळा ग्रुप तर्फे डॉ. अनिल भिकाने यांचे स्वागत झाल्यानंतर रमाकांत बनशेळकीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व
जागतिक अयन दिन सूर्य व पृथ्वी यांचा संबंध सांगितला. नंतर प्रमुख पाहुणे डॉ. अनिल भिकाने म्हणाले कि, माणसाच्या दैनंदिन आहारात दूध अत्यंत आवश्यक आहे. शरीराच्या योग्य वाढीसाठी कॅल्शियम, जीवनसत्व दुधात असतात. दूध हे पूर्ण आहार आहे. लहान बाळासाठी दूध हे अमृतच आहे.ह्यासाठी दूध उत्पादन वाढविण्याची अत्यंत गरज आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वानाथ
मुडपे गुरुजींनी केले. तर दशरथ शिंदे यांनी उपस्थिताचे आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत रोडगे, चंद्रकांत पांचाळ, लक्ष्मीकांत बिडवे, पांडुरंग बोडके, वैजनाथ पंचगल्ले, हावगीराव आचार्य, अशोकराव बिरादार, नवनाथ पाटील, रामराव मोमले मामा,सच्चिदानंद पुट्टेवाड, संजय कानगुले, वाडेकर इत्यादींनी परिश्रम घेतले.