शिवाजी महाविद्यालयात फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत फिटनेस अवेरनेस कॅम्प संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) येथील शिवाजी महाविद्यालयात फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत फिटनेस कॅम्प यशस्वीरित्या संपन्न झाला. व्यक्ती समाज आणि राष्ट्र समृद्ध ठेवण्यात व्यायाम महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो.जर देशाचे नागरिक निरोगी असतील तर तो देश जीवनाच्या प्रत्येक पैलूत नक्कीच उंची गाठेल.नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर व्यायामाने निरोगी ठेवण्यास मदत होते.व्यायाम ही एक निरोगी जीवनशैली आहे.जे लोक नियमित व्यायाम करतात त्याचा मृत्यूचा धोका कमी होतो. हाच उद्देश समोर ठेवून या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
शिवाजी महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाने विविध शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जागरूकता शिबिराचे आयोजन केले होते.त्यात विविध शाळेच्या पाचवी ते आठवी वर्गाच्या 250 ते 300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सदर प्रशिक्षण शिबिरात शालेय विद्यार्थ्यांना विविध उपकरणांच्या माध्यमातून विविध स्नायूंना व्यायामाद्वारे कसे बळकट करता येते याचे प्रात्यक्षिक क्रीडा विभाग प्रमुख प्रा.नेहाल अहमद खान यांनी दाखवले व व्यायामाबद्दल सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. कु. खोबे गौरी या राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी विविध व्यायामाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयी मार्गदर्शन केले.डॉ.अनंत टेकाळे, लाडके आर एम, नगरे , देविदास उदगिरे यावेळी उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल सातत्याने प्रोत्साहन देणारे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील, उपाध्यक्ष माधवराव पाटील, सचिव पांडुरंग शिंदे, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील व इतर कार्यकारिणी सदस्य, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.एम. मांजरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.जी.जी. सूर्यवंशी, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.