.ना.बाबासाहेब पाटील यांना कॅबिनेट मंञी पदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) :नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार ना. बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर विधानसभा मतदार संघातून विक्रमी मताधिक्याने विजय मिळवल्याने महाराष्ट्र सरकारने त्यांची कॅबिनेट मध्ये सहकार मंत्री म्हणून नियुक्ती केली.जनतेच्या प्रचंड पाठिंब्याने त्यांना विधानसभेत जागा मिळवून दिलीच, पण महायुतीच्या माध्यमातून राज्य सरकारमध्येही त्यांना महत्त्वाचे मंत्रीपद मिळाले आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच अहमदपूर विधानसभा मतदारसंघात ना बाबासाहेब पाटील हे आल्यानंतर लातूर जिल्हा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्रीमती उत्तराताई कलबुर्गे विधानसभा प्रमुख सौ.शिवकर्णा अंधारे,तालुकाध्यक्ष श्रीमती उषा माने,शहराध्यक्ष सरोजा वारकरे,शामला कारामुंगे,मंदाकिनी जिवणे , रेणूका डुबूकवार, स्वाती वटमवार, बबिता पांढरे,जया काबरा, सह सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांचा त्यांच्या निवासस्थानी सत्कार करून त्यांना महिला आघाडीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.