उदगीर – नांदेड बसला अपघात, जीवित हानी नाही

0
उदगीर - नांदेड बसला अपघात, जीवित हानी नाही

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथून नांदेड कडे निघालेली बस (क्रमांक एम एच 24 ए यु 8056) ही तोंडारपाठी येथील सायली बार समोर चक्क पलटी झाली आहे. मोठे वळण आणि उतारावर अचानक चुकीच्या बाजूने एक कार समोर येताना पाहून बस चालकाने ब्रेक दाबल्यामुळे बस पलटी झाली, त्यामुळे मोठा अपघात होता होता टळला. नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथे यात्रा असल्यामुळे लोक या गाडीमध्ये जात होते, असे समजते. सदरील गाडीमध्ये 26 प्रवासी होते. त्यापैकी तेरा प्रवासी हे किरकोळ जखमी झाले असून जखमींना तातडीने उदगीर येथील सामान्य रुग्णालयात त्यासाठी दाखल करण्यात आले. ही गाडी पलटी झाली असली तरीही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. सकाळी सव्वा सात ते साडे सातच्या दरम्यान हा अपघात झाल्याचे समजते. अचानक समोरच्या कारला वाचवण्यासाठी चालकाने ब्रेक दाबल्याने चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे एसटी प्रशासनाने कळविले आहे. तरी कित्येक गाड्या ह्या कालबाह्य झालेल्या आहेत. अशी काहीजण ओरड करत आहेत.

चौकट…….
सर्व गाड्या सुस्थितीत…
उदगीर बस आगाराच्या सर्व गाड्या सुस्थितीत असून नादुरुस्त गाड्या रोडवर येत नाहीत. तसेच उदगीर नांदेड दररोज जाणारी ही बस चांगल्या स्थितीत होती. मात्र परिस्थितीनुसार चालकाने प्रसंगावधान ओळखून समोरून येणाऱ्या कारची धडक होऊ नये, गंभीर अपघात होऊ नये, म्हणून अचानक ब्रेक दाबल्याने हा अपघात घडला आहे. अपघातात तेरा प्रवासी किरकोळ जखमी झाले होते, त्यांना एसटी महामंडळाच्या वतीने औषधोपचार करून मदतीही केली आहे.
चिन्मय चिटणीस,
आगार प्रमुख (वरिष्ठ) उदगीर.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!