उदयगिरीत डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन
उदगीर : (एल.पी.उगीले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात दिनविशेष समिती व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 126 व्या जयंती निमित्त मराठी विषयाचे विभागप्रमुख डॉ. दीपक चिद्दरवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, दिनविशेष समिती प्रमुख डॉ. गौरव जेवळीकर, प्राध्यापक सचिव डॉ. भालचंद्र करंडे, प्रा. सचिन कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. बालाजी होकरणे, यासह अनेक प्राध्यापकांची उपस्थिती होती.
