केंद्र प्रमुख मधुकर मरलापल्ले, शेषराव राठोड व मुख्याध्यापक काशिम शेख यांचा पदोन्नती निमित्ताने निरोप
उदगीर (एल.पी.उगीले) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हकनाकवाडी ता. उदगीर जिल्हा लातूर येथे कार्यरत असलेले प्राथमिक पदवीधर मधुकर मरलापल्ले, नवनियुक्त केंद्रप्रमुख शेषेराव राठोड व नवनियुक्त मुख्याध्यापक काशिम शेख यांचा निरोप व स्वागत सोहळा दिनांक 27/12/2024 रोजी आयोजित करण्यात आला. हकनाकवाडी शाळेच्या वतीने दिनांक 27/12/2024 रोजी पदोन्नती सत्कार सोहळा संपन्न झाला.
प्रास्ताविकात शाळेतील शिक्षक संजीव पांचाळ यांनी तिघांच्या जीवनावर सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शफी शेख गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती उदगीर, प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी नितीन लोहकरे,व्यंकटेश पेद्देवाड, मुख्याध्यापक माधवराव फावडे, ज्ञानेश्वर बडगे, ज्ञानेश्वर बोयणे आदी उपस्थित होते. पदोन्नती झालेल्या तिघांच्याही जीवनावर गटशिक्षणाधिकारी यांनी कामकाज, शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावली. या बाबतीत गटशिक्षणाधिकारी शफी शेख, शिक्षण विस्तार अधिकारी नितीन लोहकरे, मुख्याध्यापक माधवराव फावडे, ज्ञानेश्वर बडगे तसेच केंद्रप्रमुख मधूकर मरलापल्ले, शेषराव राठोड व मुख्याध्यापक काशिम शेख यांनी समयोचत भाषण केले.
या निरोप व स्वागत सत्कार सोहळ्यासाठी तोंडार केंद्रातील शिक्षक, शिक्षिका, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीसाठी हकनाकवाडी शाळेतील सर्व शिक्षकांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव पांचाळ व मारोती शिरामने यांनी मानले.