अनिस च्या राज्यव्यापी अधिवेशनातविश्वनाथ मुडपे गुरुजींचा सन्मान
उदगीर (एल.पी.उगीले) डॉ. नरेंद्र दाभोळकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विवेक जागर संस्था तर्फे आळंदी येथे एक दिवशीय संविधान राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. महाराष्ट्र अनिसच्या राज्यव्यापी अधिवेशनात,परिवर्तनवादी चळवळीत गेल्या 35 वर्षापासून सातत्याने,समर्पित भावनेने
कार्य करीत असल्याबद्दल, गुजरातच्या मानवी अधिकार समितीचे प्रख्यात सामाजिक नेते डॉ. मार्टिन मकवाना यांच्या हस्ते विश्वनाथ मुडपे यांचा सपत्निक सन्मान,पदक प्रदान करण्यात येऊन सत्कार संपन्न झाला. ह्या वेळी महाराष्ट्र राज्य अनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील,राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे,रुकसाना मुल्ला, अनिल दरेकर,उत्तरेश्वर बिरादार, बाबुराव माशाळकर,प्राचार्य विजयकुमार पाटील, ज्येष्ठ गांधीवादी नेते प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विश्वनाथ मुडपे गुरुजींनी अनिसच्या
भानामती प्रबोधन यात्रा, संविधान जागृती अभियान, पर्यावरण सुधारण्यासाठी फटाके मुक्त दिवाळी अभियान, व्यसनमुक्तीसाठी दारू नको दूध प्या, शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनासाठी सातत्त्याने सहभाग नोंदविला. उदगीर शहरातील परिवर्तनवादी व विज्ञानवादी चळवळीत काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा हा सन्मान आहे. त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी हा सन्मान स्वीकारत आहे. असे विश्वनाथ मुडपे गुरुजी म्हणाले.