लोणीमोडच्या जि. प.प्रा.शाळेत तोंडार केंद्राचे नवनियुक्त केंद्रप्रमुख शेषेराव राठोड यांचा सत्कार संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) उदगीर तालुक्यातील तोंडार येथे नवनियुक्त केंद्रप्रमुख म्हनूण शेषेराव राठोड याची नियुक्ती करण्यात आली असल्यामुळे अचानक शाळा भेटी दरम्यान लोणीमोडच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अचानक भेट देवुन शाळा व परिसर ,विद्यार्थि गुणवत्ता तपासुन समाधान व्यक्त केले. इयत्ता पहीली ते चौथी विद्यार्थ्याना वाचन, लेखन व गणिती क्रिया तपासणि करुन समाधान व्यक्त केले.
यावेळी त्याच्या सोबत आलेले माजी केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी शिवदासे टि.एस. यानी विद्यार्थ्याना एक तासाची “सुंदर हास्ताक्षर ” कार्यशाळा घेतली. विद्यार्थ्याना वळणदार अक्षर कसे काढावे? याचा सराव घेतला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.प्रा.शा. लोणीमोडचे मुख्याध्यापक संजय वाघमारे, प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख शेषेराव राठोड,माजी विस्तारअधिकारी शिवदासे टि.एस. , सहशिक्षिका सुंगधी भाग्यलक्ष्मी, शिक्षण सहायक अंबुलगे दिपक, निर्मला वाघमारे , विद्याथीॅ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.