उत्तम नागरीक घडवण्याचे काम समता संदेश पदयात्रेतुन होते : माजी मंत्री आ.संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना व त्या घटनेतून आपल्या जीवनावर होणारा परिणाम हा महत्त्वपूर्ण असतो. आपण या देशाचा एक चांगला नागरिक म्हणून देश हितासाठी चांगले कार्य केले पाहिजे, आणि यासाठी आपल्या सर्वांवर बालपणापासून आई – वडील व आपल्या शाळेतुन आपल्यावर संस्कार होतात. त्याप्रमाणेच उत्तम नागरीक घडवण्याचे काम या समता संदेश पदयात्रेतुन होत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी केले.
ते उदगीर शहरातील वीरशैव लिंगायत भवन येथे शरण उरीलिंग पेद्दी जयंतीनिमित्त कंधार ते बसवल्याण येथे जाणार्या समता संदेश पदयात्रेतील कार्यक्रमात शरण बांधवांना शुभेच्छा देताना बोलत होते.
यावेळी गुरुवर्य डाॅ.शंभुलिंग शिवाचार्य महाराज, गुरूवर्य पंचय्या स्वामी महाराज, हणमंत औरादे, उध्दव महाराज हैबतपुरे, शिवानंद हैबतपुरे, अनिता हैबतपुरे,
बसवराज रोडगे, विजय निटुरे, अमोल निडवदे, नागेश आष्टुरे, गुरुलिंग स्वामी, अॅड.नीळकंठ पाटील, विठ्ठलराव पाटील, साईनाथ पाटील, शिवसांब होनराव, संजय भुरे पाटील, साधु लोणीकर, बसवराज स्वामी, सतिश गायकवाड, लक्ष्मीबाई पांढरे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी,
समता संदेश पदायात्रेच्या सुरुवातीला
केवळ ५ बसव भक्त होते, मात्र समता पदयात्रेचे कार्य पाहुन आज हजारो भक्त जोडले गेले आहेत. मागील काळात जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा समजून कार्य केले. श्री गुरु हावगीस्वामी मठ व चौकी मठाला निधी दिला. किल्ल्याच्या जतन व दुरुस्तीसाठी निधी दिला. जळकोटला ही लिंगायत भवनाची निर्मिती केली. म.बस्वेश्वर महाराजांचा पुतळा उभारला, विविध मंदिराला निधी दिला असुन आपल्या पुढच्या पिढीवर यामुळे चांगले संस्कार होतील अशी अपेक्षा आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केली.
यावेळी बसवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
बसवकल्याणच्या अनुभव मंडप धरतीवर उदगीरात प्रवेशव्दार उभारणारण्याचा मानस
उदगीर येथे लिंगायत भवन उभारणीसाठी डाॅ.शंभुलिंग शिवाचार्य महाराजांना विनंती केली व ती तात्काळ मान्य करुन लिंगायत भवनासाठी जागा उपलब्ध करुन दिल्याने ही वास्तु उभारली आहे. याचप्रमाणे समाज प्रबोधन व्हावे, पुढच्या पिढीवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून श्री रेणुकाचार्य संस्कार भवनची निर्मिती होत आहे. त्याचाही लोकार्पण सोहळा करणार आहोत. बसवकल्याण येथील अनुभव मंडपच्या धरर्तीवर प्रवेशव्दार उभारण्याचा आपला मानस असल्याचे आ. संजय बनसोडे सांगितले.