वाचन संस्कृतीची जोपासना झाली पाहिजे -डॉ.विश्वंभर गायकवाड
उदगीर (एल.पी.उगीले) वाचक वाचनापासून दूर गेलेले आहेत. विविध माध्यमे आलेली आहेत, त्याचा वापर जास्त करत आहेत.त्यामुळे वाचन संस्कृतीची जोपासना झाली पाहिजे असे उद्गार राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विश्वंभर गायकवाड यांनी काढले. ते येथील शिवाजी महाविद्यालयामध्ये आयक्यूएसी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राच्या अंतर्गत आयोजित केलेल्या व्याख्यान प्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एम.मांजरे हे होते, तर प्रमुख उपस्थिती कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.जी.जी. सूर्यवंशी, संयोजक डॉ.विष्णू पवार यांची होती. पुढे बोलताना डॉ.गायकवाड म्हणाले, आज वाचनाचे स्वरूप बदलले आहे. वाचनामुळे संयम,एकाग्रता येते, माणसाची बौद्धिकता वाढते, प्रगल्भता वाढते,संस्कृती कळते. भिल्हार गाव हे पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जात आहे. त्या गावाला अवश्य भेट दिली पाहिजे. प्रत्येकाने एका वर्षात वयाच्या दुप्पट पुस्तके वाचावीत, असेही ते म्हणाले. अध्यक्षीय समारोपप्रसंगी डॉ. मांजरे म्हणाले, मीडियाच्या माध्यमातून आपण वाचन संस्कृती पासून थोडेसे दूर गेलेलो आहोत, पण आपण जेवढे जास्त वाचन केले तेवढे आपले ज्ञान वाढत जाते.
यावेळी कार्यक्रमाला डॉ . नरसिंग कदम, डॉ.अनुराधा पाटील,प्रा.पावडे डॉ.उर्मिला शिरशी, डॉ.एल.एच.पाटील, डॉ.एन.डी.शिंदे, डॉ.ए. एस. टेकाळे, डॉ.एम.एन.शेख, डॉ.एस.व्ही.चाटे,प्रा. बालाजी सूर्यवंशी, डॉ .एस.डी.सावंत, डॉ.व्ही.के.भालेराव प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विष्णू पवार यांनी आभार प्रा. रंजन येडतकर यांनी मानले.