शेकापूर येथील सावित्रीबाई फुले वाचनालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
उदगीर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे शेकापूर येथील सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रंथमित्र सूर्यकांत शिरसे व ग्रंथालय चळवळीतले उदगीर तालुका मार्गदर्शक प्रमुख पाहुणे हंसराज जी मोमले सेक्रेटरी शेकापूर सोसायटीचे हंसराज जी मोमले, देवणी तालुका मार्गदर्शक रामेश्वर बिरादार नागराळकर, सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष लक्ष्मण फुलारी (भालके), सामाजिक कार्यकर्ते संतोष सावंत हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमातच जनार्दन कोनाळे, पंडित शेलाळे या दोन नियमित असलेल्या वाचकांचा सत्कार करण्यात आला. ग्रंथालयाच्या वतीने नागनाथ कुंभार, अंगद शिंदे, बाबुराव कोनाले, ऋषी सावंत, बलभीम शेवाळे, देवेंद्र शेवाळे, धनाजी सावंत, हनुमंत सावंत, ग्रंथालयातले कर्मचारी ओम फुलारी व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. वाचन संकल्प पंधरवाडा उपक्रमही राबविण्यात आला. या कार्यक्रमात बोलत असताना ग्रंथ मित्र सूर्यकांत शिरसे यांनी वाचन संस्कृती वाढलीच पाहिजे, वाचाल तर वाचाल, हे उद्देश श्रीकांत शिरसाठ यांनी मांडले. या ग्रंथालया च्या वतीने शेकापूर या गावात गेल्या पंधरा वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत.
ग्रंथालयाच्या वतीने गावातील सामाजिक कार्य व गावातील वृक्ष लागवड असेल, वनराई बंधारे असेल व सामाजिक कार्याचा भाग म्हणून स्वच्छता अभियान असेल या ग्रंथालयाच्या वतीने प्रभावीपणे राबवण्यात आले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ग्रंथालयाच्या वतीने गावामध्ये राबवण्यात आले आहेत. सूत्रसंचालन प्रास्ताविक लक्ष्मण भालके आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे ग्रंथपाल यांनी केले.