लोणीमोडच्या जि.प. प्रा.शाळेत “बालिका दिन” ‘महिला मुक्ती’ दिन साविञीबाई फुले जन्मदिन साजरा !
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील लोणीमोडच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालिका दिन ,महिला मुक्ती दिन, सावित्रीबाई फुले जन्मदिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यानी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्येतिबा फुले याच्या भुमिकेत आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी, भाग्यश्री बाबर, श्रेया सुर्यवंशी, आलिया मुंजेवार ,सुरनर सोनाक्षी, मुस्कान शेख, सना पठाण, रोहीनी कानुरे, फातेमा शेख, मयुरी खपरले, माहेश्वरी खपरले,इशरा शेख, ज्ञानेश्वरी शिंदे,मारिया मूंजेवार, तर महात्मा जोतिबा फुले याच्या वेशात सागर शिंदे , सुरज शिंदे, खपरले प्रसाद, राहील शेख, अदिल शेख, अरखाम शेख, अखलाख शेख, ज्ञानराज कानूरे,बालाजी जाधव, जैद शेख,रुद्र रायवाड,रघुविर वाघमारे यानी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय वाघमारे,प्रमूख पाहुणे म्हनुण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शादुल शेख या होत्या. बालिका दिना विषयी मार्गदर्शन सहशिक्षिका सुंगधी भाग्यलक्ष्मी यानी मांडले सुत्रसंचलन शिक्षण सहायक अंबुलगे दिपक यानी मानले. यावेळी निर्मला वाघमारे, सुप्रिया वाघमारे, विद्याथीॅ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.