रस्सीखेच स्पर्धेत शिवाजी महाविद्यालयाचा महिला संघ तृतीय
उदगीर (एल.पी.उगीले) स्वामी विवेकानंद महाविद्यालय मुक्रमाबाद येथे आयोजित केलेल्या विभागीय आंतर महाविद्यालयीन महिलांच्या रस्सीखेच स्पर्धेत शिवाजी महाविद्यालयाच्या महिलांच्या संघाने आपल्या नैपुण्याच्या बळावर तृतीय क्रमांक मिळवला. या संघाचे नेतृत्व कर्णधार कु. कांबळे निकिता हिने केले, तर तिला तेलंगे पल्लवी, सूर्यवंशी महादेवी,पाटील आशा, कांबळे अक्षरा, बूंदराळे स्नेहा,नाईक रमा, हुडे सुचिता,कांबळे साक्षी, मुस्कान फातेमा यांनी उत्कृष्ट साथ दिली. या विजयाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
खेळाडूच्या या यशाबद्दल खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहित करणारे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील, उपाध्यक्ष माधवराव पाटील, सचिव पांडुरंग शिंदे, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील, व इतर कार्यकारिणी सदस्य,महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.एम. मांजरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.जी.जी.सूर्यवंशी,शिक्षक व कर्मचारी, विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
खेळाडूला क्रीडा विभाग प्रमुख प्रा. नेहाल अहेमद, प्रा.गजानन माने यांनी मार्गदर्शन केले.