दूध तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्यातर्फे उन्नत भारत अभियान अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन
उदगीर (एल.पी.उगीले) : दूध तंत्रज्ञान महाविद्यालय, उदगीर यांच्या वतीने उन्नत भारत अभियान अंतर्गत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मौजे घोन्शी, तालुका उदगीर, येथे महिलांसाठी “कुटीर स्तरावरील पनीर निर्मिती” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय, उदगीरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. माधव पाटील होते. तसेच, घोन्शी गावचे पोलीस पाटील श्री. परगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यशाळेत घोन्शी गावातील 50 महिलांनी सहभाग घेऊन कुटीर स्तरावरील पनीर निर्मिती तंत्रज्ञानाबद्दल सखोल माहिती घेतली.
सदर कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी उन्नत भारत अभियानचे समन्वयक डॉ. प्रवीण सावळे, डॉ. बुलबुल नगराळे, डॉ. श्रीकांत कल्याणकर, डॉ. नितीन शिंदे, प्रा. महेश देशमुख, श्री. बावणे, श्री. नितीन कुलकर्णी यांच्यासह दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या पाचव्या सत्रातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोलाचे योगदान दिले.