श्री.गुरु ह.भ.प.ब्रम्हनिष्ठ वै. विठ्ठल महाराज सांडोळकर यांच्या तपपुतीॅ समाधी सोहळा व अंखड हरिनाम सप्ताह निमित्त निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे किर्तन – भास्कर महाराज सांडोळकर
उदगीर (एल.पी.उगीले)उदगीर तालुक्यातील लोणी येथिल श्री.विठ्ठल रुक्मीनी मंदिर समाधी मंदिर महादेव मंदिर प्रतिष्ठाण एम.आय.डी.सी. लोणी येथे श्री.गुरु ह.भ.प. ब्रम्हनिष्ठ वै. विठ्ठल महाराज सांडोळकर यांच्या तपपुतीॅ समाधी सोहळा व अखड हरिनाम सप्ताह 1/1/2025 ते दि 8/1/2025 काल्याचे किर्तनाने शेवट होणार आहे. दि 6/1/2025 रोजी रात्री श्री. ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर महाराज याचे किर्तन होणार आहे. तरी महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक राज्यातील भाविक भक्तानी या किर्तनाचा लाभ घ्यावा. दि.7/1/2025रोजी श्री.ह.भ.प. ब्रम्हनिष्ठ वै. विठ्ठल महाराज सांडोळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त गुलालाचे किर्तन सकाळी 11ते1श्री.ह.भ.प. विजयानंद महाराज सुपेकर होईल, रात्री 9ते11श्री.ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे नेकनूर याचे किर्तन होईल. सप्ताह शेवट सकाळी दिंडी मिरवणुकी नतंर काल्याचे किर्तन श्री.ह.भ.प. ब्रम्हनिष्ठ मठाधिपती भास्कर महाराज सांडोळकर याचे होणार काल्याकिर्तनानतंर महाप्रसाद समस्त लोणी गावकरी मंडळी तफेॅ होणार आहे.
या भव्य दिव्य सोहळाचा आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर प्रतिष्ठाण तफेॅ करण्यात आले आहे.