सावित्रीबाई फुले यांनी महिलांना सन्मान मिळवून दिला – नीता मोरे
उदगीर (एल.पी.उगीले): थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाला महत्व देत महिलांना सन्मान मिळवून देण्याचे काम केले. असे प्रतिपादन लाल बहादुर शास्त्री विद्यालयातील उपक्रमशील शिक्षिका नीता मोरे यांनी केले.
त्या उदगीर येथील जिव्हाळा ग्रुपच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी बोलत होत्या.
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष रमाकांत बनशेळकीकर, सचिव लक्ष्मीकांत बिडवई, सोपानराव माने यांची उपस्थिती होती.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक देविदासराव नादरगे यांनी केले.
यावेळी नीता मोरे म्हणाल्या, ग्रामीण महिलांचे जीवन म्हणजे जणू चूल आणि मूल इतक्या मर्यादित होते. ते चित्र सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या कष्टाने बदलले. चिखल असलेल्या आयुष्याचे अष्टगंधात रूपांतर झाले. स्त्री शिक्षणामुळे समाजात परिवर्तन झाले व प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी स्वतःची विशेष ओळख निर्माण केली. ती आत्मनिर्भर झाली असे सांगून सावित्रीबाईंच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला.
याप्रसंगी शिवमुर्ती भातांब्रे, रमेशआण्णा अंबरखाने,रतिकांत आंबेसंगे, शंकर केंद्रे, हावगीराब आचारे, विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, अमृतराव सताळकर यांच्यासह जिव्हाळा ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.