नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात संपन्न”

0
नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात संपन्न”

उदगीर (एल.पी.उगीले) : राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करणेसाठी पोषक वातावरण निर्माण करणेसाठी क्रीडा धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा धोरणामध्ये क्रीडा विषयक पायाभूत सुविधांची निर्मिती, खेळाडूंचे प्रशिक्षण तसेच विकास या बाबीचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यानुषंगाने संचालनालयाच्या राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हास्तर व अधिनस्त नगरपरिषद, नगरपंचायत स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची शारिरीक तंदुरुस्ती व कार्यक्षमता वाढीस हातभार लागेल. तसेच विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकोपा, समन्वय व स्नेहभाव वाढीस लागेल. राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये विविध खेळ प्रकारात वेगवेगळ्या स्तरावर प्राविण्य प्राप्त खेळाडू असल्याने दरवर्षी क्रीडा स्पर्धा घेतल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह येईल व त्याचा उपयोग कार्यक्षमता वाढीकरीता होईल. जेणेकरून अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कामाचा व मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल. मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सुनियोजित व यशस्वीरित्या आयोजन करून त्याचा अनुपालन अहवाल संचालनालयास सादर करण्यात यावा असे निर्देश आयुक्त तथा संचालक , नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी दिले आहे. त्यानुसार लातूर जिल्हा नगरपरिषद प्रशासन विभागाने जिल्ह्यतील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत यांच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम उदगीर नगरपरिषदे कडे आयोजनाची जबादारी देण्यात आली होती. उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हा सह आयुक्त मंगेश शिंदे, उदगीर न.प. मुख्याधिकारी तथा जिल्हा क्रीडा स्तरीय समितीचे सचिव सुंदर बोंदर, अहमदपूर न.प. मुख्याधिकारी संतोष लोमटे, जळकोट न.प. मुख्याधिकारी रोहित आरबोळे, चाकुर न.प. मुख्याधिकारी प्रतिक लंबे, शिरूर अनंतपाळ न.प. मुख्याधिकारी दिपक भराट यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळे लातूर जिल्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा, रेणापूर, जळकोट, चाकूर, शिरूर अनंतपाळ, देवणी या नगरपरिषद व नगरपंचायतचे अधिकारी कर्मचारी आपले विविध क्रीडा स्पर्धेसाठी संघ घेवून सहभागी होते. येथे क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन, १०० मी धावणे, हॉलीबॉल इ. क्रीडा स्पर्धा झाल्यात त्यात स्पर्धा व विजेते पुढीलप्रमाणे क्रिकेट- उपविजेता अहमदपूर नगरपरिषद संघ तर विजेता देवणी नगरपंचायत संघ, तर क्रिकेट मॅन ऑफ द सिरीज नाजिम शेख. कबड्डी – उपविजेता अहमदपूर नगरपरिषद संघ तर विजेता उदगीर नगरपरिषद संघ.बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी – उपविजेता अजय दळवी उदगीर नगरपरिषद तर विजेता मुकेश सूर्यवंशी निलंगा नगरपरिषद. बॅडमिंटन महिला एकेरी- उपविजेता सरस्वती वाळके अहमदपूर नगरपरिषद तर विजेता प्रज्ञा पाटोळे निलंगा नगरपरिषद. बॅडमिंटन दुहेरी पुरुष- उपविजेता मयूर शिवशेट्टे व आशुतोष जाधव उदगीर नगरपरिषद तर विजेता मुकेश सूर्यवंशी व भरत शिंदे निलंगा नगरपरिषद. १०० मी धावणे महिला – तृतीय सरस्वती वाळके अहमदपूर नगरपरिष, द्वितीय श्रद्धागिरी अहमदपूर नगरपरिषद तर प्रथम प्रणाली जाडकर देवणी नगरपंचायत. १०० मी धावणे पुरुष -तृतीय ज्ञानदेव दहिफळे रेणापूर नगरपंचायत, द्वितीय निखिल सुतार चाकूर नगरपंचायत, प्रथम सुरेश चामनेर अहमदपूर नगरपरिषद. हॉलीबॉल – सामने बीआरसी मैदान येथे घेण्यात आले यामध्ये उपविजेता देवणी नगरपंचायत संघ तर विजेता औसा नगरपरिषद संघ
दि. ४ जानेवरी २०२५ रोजी शिवम रिसोर्ट कवळखेड येथे जिल्हा सह आयुक्त मंगेश शिंदे, उदगीर न.प. मुख्याधिकारी तथा जिल्हा क्रीडा स्तरीय समितीचे सचिव सुंदर बोंदर, अहमदपूर न.प. मुख्याधिकारी संतोष लोमटे, जळकोट न.प. मुख्याधिकारी रोहित आरबोळे, चाकुर न.प. मुख्याधिकारी प्रतिक लंबे, शिरूर अनंतपाळ न.प. मुख्याधिकारी दिपक भराट यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रम व इन डोअर गेम उद्घाटन करण्यात आले. त्यात रांगोळी स्पर्धा, सामूहिक नृत्य, वेशभूषा, कविता वाचन, गीतगायन वैयक्तिक व सामूहिक अशा विविध सांस्कृतिक स्पर्धा, रस्सीखेच इ. स्पर्धा संपन्न झाल्यात. त्यात स्पर्धा व विजेते पुढीलप्रमाणे रस्सीखेच महिला- उपविजेता अहमदपूर नगरपरिषद संघ तर विजेता निलंगा नगरपरिषद संघ. रस्सीखेच पुरुष – उपविजेता उदगीर नगर परिषद संघ तर विजेता रेनापुर नगरपंचायत संघ. कॅरम महिला – उपविजेते प्रज्ञा पाटोळे निलंगा नगरपरिषद विजेते डॉ.विजय येलगुलवार उदगीर नगरपरिषद. कॅरम पुरुष – उपविजेते शेख सुलतान व राम वाघमारे अहमदपूर नगरपरिषद तर विजेते अमित सुतार व अतुल गवारे उदगीर नगरपरिषद. बुद्धिबळ महिला – उपविजेते श्रद्धा आतनुरे निलंगा नगरपरिषद तर विजेते डॉ.विजय येलगुलवार उदगीर नगरपरिषद. बुद्धिबळ पुरुष – उपविजेते राजकुमार कपाळे उदगीर नगरपरिषद तर विजेते दिनेश राऊत औसा नगरपरिषद. रांगोळी मध्ये प्रथम योगिता पाटील चाकूर नगरपंचायत, वेशभूषा मध्ये तृतीय माया बेद्रे (राजमाता जिजाऊ) उदगीर नगरपरिषद द्वितीय शिवराज राठोड (गणपती) अहमदपूर नगरपरिषद तर प्रथम प्रेमनाथ गायकवाड (वासुदेव) निलंगा नगरपरिषद. कविता वाचन (स्वलिखित) तृतीय मयूर शिवशेट्टे उदगीर नगरपरिषद द्वितीय श्रद्धा आतनुरे व वैष्णवी होनराव निलंगा नगरपरिषद तर प्रथम प्रशांत गायकवाड अहमदपूर नगरपरिषद गीतगायन वैयक्तिक- तृतीय निखील सुतार चाकूर नगरपंचायत, द्वितीय रविंद्र कांबळे देवणी नगरपंचायत तर प्रथम दिपिका अनकल्ले. सामुहिक गीतगायन – उदगीर नगरपरिषद संघ. समूह नृत्य – श्रद्धा आतनुरे व वैष्णवी होनराव निलंगा नगरपरिषद. या सर्व विजेते संघ व स्पर्धक यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले.
या दोन दिवशी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत मधील अधिकारी कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेऊन आनंद घेतला. कार्यक्रमाचे आयोजन सुंदर बोंदर मुख्याधिकारी उदगीर नगरपरिषद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. क्रीडा स्पर्धा रोहित आरबोळे, मुख्याधिकारी जळकोट नगरपंचायत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या. संपर्क माहिती व प्रसिद्धी भोजन व्यवस्था संतोष लोमटे मुख्याधिकारी अहमदपूर नगरपरिषद यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन झाले. सांस्कृतिक कार्यक्रम प्रतिक लंबे मुख्याधिकारी चाकूर नगरपंचायत तर बक्षीस वितरण दीपक भराट मुख्याधिकारी शिरूर अनंतपाळ नगरपंचायत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. व्यवस्थापन व तक्रार निवारण समिती मंगेश शिंदे मुख्याधिकारी औसा नगरपरिषद यांच्या नियंत्रणाखाली होती.
या क्रीडा स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे सर्व नगरपरिषद व नगरपंचायत यांचे संघ हे आपल्या विविध रंगाच्या व नाव असलेल्या पोशाखात होते.
या दोन दिवसीय स्पर्धेचे आयोजनामध्ये पूर्णवेळ सक्रिय राहून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणारे नितीन ढोणे, बालाजी कोळी, ज्ञानदेव दहिफळे, संदीप कानमंदे व महारुद्र गालट यांनी परिश्रम घेतल्या बद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *