उदगीरच्या वैष्णवी पवारला राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये दुहेरी सुवर्ण
उदगीर (एल.पी.उगीले) : 3 ते 5 जानेवारी रोजी जयपूर राजस्थान येथे झालेल्या सब जुनिअर राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत वैष्णवी बाबाराव पवार हिने 677 गुण घेत पुर्ण भारतात प्रथम क्रमांक मिळवीत रँकिंग प्रकारात गोल्ड मेडल तसेच इलिमिनेशन प्रकारात ब्रॉन्झ व सांघिक गोल्ड मेडल मिळविले. वैष्णवी ही उदगीर तालुक्यातील मलकापूर या गावची राहणारी आहे. ती दिवसभरातील 8 ते 10 तास सराव करते, तसेच ती अभ्यासात पण लक्ष देते. तिची ही मेहनत पाहून पुनीत बालन ग्रुप नी तीला मदतीचा हात दिला, त्यामुळे तिच्या प्रशिक्षणामध्ये तीला मोठा हातभार मिळाला.
वैष्णवी ही गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडेमी मध्ये प्रशिक्षक सुधीर पाटील, सुषमा पवार व मारोती बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. व तीला मेंटल टफनेस चे प्रशिक्षण श्री मिथुन कुंडू यांच्या मार्फत भेटत आहे.
तीला या यशासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी अशोक जंगमे व राजेश देवकर यांनी अभिनंदन केले. तसेच क्रीडा प्रेमी भास्कर पाटील, गजानन पवार , विशाल जाधव , महेंद्र बिरादार ,यमुनाजी भुजबळे,उमाकांत भेदे यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.