रोटरीने तळागाळातील लोकांना मदतीचा हात दिला – डॉ. सुरेश साबू
उदगीर (एल.पी.उगीले) : रोटरी क्लब ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी मोठी संस्था असून या संस्थेने समाजातील तळागाळातील माणसाला मदतीचा हात देण्याचे काम केले आहे. असे प्रतिपादन रोटरी क्लब चे प्रांतपाल डॉ. सुरेश साबू यांनी केले.
उदगीर येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने समाजातील विविध व्यवसायात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यावसायिकांचा व्यवसाय सेवा पुरस्कार डॉ. साबू यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर रोटरी क्लबचे सहायक प्रांतपाल किशोर देशपांडे, रोटरी क्लबच्या अध्यक्षा सरस्वती चौधरी, सचिव ज्योती चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन व्यंकटराव कणसे यांची उपस्थिती होती.
यावेळी ऍड. गुलाब पटवारी, चंद्रकांत पाटील कोळखेडकर, केशरचंद हिराशा डांगुर, सौ. वर्षा प्रमोद पत्तेवार, गोदावरी रामराव शिंदे यांचा व्यवसाय सेवा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तर प्रभुआप्पा नागप्पा चौधरी यांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. साबू यांनी रोटरीच्या जागतिक पातळीवरील कार्याचा आढावा सांगून या कार्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत, ते काम निष्ठेने व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करीत राहावे, या कामात सातत्य ठेवले तर यश निश्चित प्राप्त होते. असेही डॉ. साबू यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लबच्या अध्यक्षा सरस्वती चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन विशाल तोंडचिरकर व प्रा. मंगला विश्वनाथे यांनी केले, तर ज्योती चौधरी यांनी आभार मानले.
यावेळी संतोष फुलारी, विजय पारसेवार, डॉ. सुधीर जाधव, सुयश बिरादार, अभिजित पटवारी, डॉ. संतोष पांचाळ, डॉ. विजयकुमार केंद्रे, अनिल मुळे, रमेश निजवंते, डॉ. बस्वराज स्वामी, पवन मुत्तेपवार, सुनीता मदनुरे, विद्या पांढरे, ऍड. मंगेश साबणे, विक्रम हलकीकर यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.