उदगीरच्या विमानतळाला मंजुरी द्यावी ; माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांची मागणी

0
उदगीरच्या विमानतळाला मंजुरी द्यावी ; माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांची मागणी

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर विधानसभा मतदार संघ हा आंध्रप्रदेश, तेलंगणा व कर्नाटक राज्याच्या सिमेवर आहे. उदगीर नगरी ही ऐतिहासिक असून या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. तसेच जिल्हास्तरीय सर्व कार्यालये, प्रादेशिक परिवहन (आर.टी.ओ.) कार्यालयासह वेगवेगळ्या प्रकारची जिल्हास्तरीय कार्यालये आहेत. तसेच रेल्वेची कनेक्टीव्हीटी असल्याने दळणवळणासाठी लागणाऱ्या सर्व यंत्रणा उदगीर मतदार संघात उपलब्ध होत आहेत. नियोजित विमानतळासाठी मुबलक प्रमाणात जागाही उदगीर येथे उपलब्ध असून विमानतळास मंजूरी दिली तर येथील मागास भागाचा विकास होण्यास मदत होईल, आणि या भागातील विविध प्रश्न सुटतील.
सदर विमानतळ उदगीरला झाले तर आंध्रप्रदेश, तेलंगणा व कर्नाटक राज्यातील
व्यापा-यांना याचा फायदा होणार आहे. या भागातील नागरिकांना देश – विदेश व धार्मिक स्थळांना जाण्यासाठी याचा फायदा होणार आहे.
म्हणून विमानतळास मान्यता दयावी अशी विनंती माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागरी उड्डान मंत्री मुरलीधर मोहोळ, एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियाचे चेअरमन विपीन कुमार यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
आ. संजय बनसोडे यांनी 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत उदगीर मतदार संघातील जनतेला उदगीर येथे विमानतळ उभारणार असल्याचे वचन दिले होते. त्या वचनाची पूर्ती करताना पहिले पाऊल आ. बनसोडे यांनी उचलून उदगीरच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस काम करणार असल्याची ग्वाही दिली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *