एलसीबीच्या पथकाची कामगिरी धमाल !!पैशाची बॅग लुटणाऱ्या आरोपी कडून जप्त केला 7 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल !!
लातूर (ॲड. एल.पी.उगिले) लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एकानंतर एक धडाकेबाज कामगिरी करत धमाल केली आहे. या पथकाने पैशाची बॅग लुटणाऱ्या आरोपीकडून सात लाख 80 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.मोटर सायकलवरून बँकेमध्ये भरण्यासाठी पैसे घेऊन जात असताना पैशाची बॅग हिसकावणाऱ्या आरोपीला अटक अटकी करण्यात आली आहे तसेच त्याच्याकडून रोख रक्कम व मोटरसायकलसह 7 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, काही दिवसापुर्वी बाभळगाव ते बसवेश्वर चौक जाणारे रिंग रोडवर मोटार सायकल वरून 7 लाख 21 हजार रुपयांची बॅग घेऊन जात असताना सदरील बॅग लुटण्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी,अमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकामार्फत विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते. सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रात्र- दिवस परिश्रम घेत होते. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती.
दरम्यान 07/01/2025 पोलीस पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, पैशाची बॅग लुटणाऱ्या गुन्ह्यातील एक आरोपी रिंग रोड वरील मळवटी चौक परिसरात थांबलेला आहे. अशी माहिती मिळताच, सदर माहितीची शहनिशा करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात नमूद गुन्हयातील संशयित आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अनिकेत विठ्ठल सगरे, (वय 24 वर्ष, रा. मळवटी रोड, नाथ नगर,लातूर). असे असल्याचे सांगून तो व त्याचे सोबतचे आणखीन पाच मित्र अशा सर्वांनी मिळून काही दिवसांपूर्वी बाभळगाव ते बसवेश्वर चौकाकडे जाणाऱ्या रिंग रोड वरून एका मोटरसायकल स्वारास अडवून त्याच्याकडील पैशाची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेऊन चोरी केल्याचे सांगितले. त्यांची नावे विष्णू मांगीलाल प्रजापती, (रा. इकबाल चौक, मळवटी रोड, लातूर),पवन लक्ष्मण बोयने, (रा. अराफत चौक, मळवटी रोड, लातूर),
शुभम शिंदे, (रा.इकबाल चौक, लातूर),
अमन आदम सूर्यवंशी, (रा. आझाद शाळेच्या पाठीमागे, मळवटी रोड, लातूर),अमरदीप रवी काळे, (रा. म्हाडा कॉलनी, बाबळगाव रोड, लातूर).असे असून वर नमूद आरोपींनी मिळून पैशाची बॅग जबरदस्तीने चोरल्याचे सांगितले. नमूद आरोपी कडून गुन्ह्यातील चोरलेल्या रकमेपैकी 5 लाख 60 हजार रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेले दोन मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहेत.
आरोपी अनुक्रमांक 2 ते 6 आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. एक आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही करिता पोलीस ठाणे विवेकानंद चौक यांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार सूर्यकांत कलमे, रियाज सौदागर, सुधीर कोळसुरे, राजेश कंचे, योगेश गायकवाड ,विनोद चलवाड, तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले, जमीर शेख, चालक पोलिस अमलदार प्रदीप चोपणे व पोलिस ठाणे विवेकानंद चे पोलिस अमलदार आनंद हल्लाळे, रणवीर देशमुख यांनी केली आहे.