स्थानिक गुन्हे शाखेकडून 1 लाख 4 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त.

0
स्थानिक गुन्हे शाखेकडून 1 लाख 4 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त.

लातूर (एल.पी.उगीले) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने अवैध धंद्यावर पाळत ठेवून धाडी टाकण्याचे मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू स्वतःच्या फायद्यासाठी अवैधरित्या विक्री व्यवसाय करत असल्याची माहिती मिळताच धाड टाकून एक लाख चार हजाराचा मध्यमाल जप्त केला आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत.
अवैध धंद्याची माहिती काढत असताना दिनांक 07/01/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, बसवेश्वर चौक ते कवा गावाकडे जाणाऱ्या रोडच्या डाव्या बाजूस असलेल्या संभाजीनगर परिसरात रोडवर एक इसम महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करीत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 07/01/2025 रोजी नमूद संभाजीनगर परिसरातून ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्याचे कडे महाराष्ट्र शासनाने बंदी महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला वेगवेगळ्या कंपनीचा 1 लाख 4 हजार 450 रुपयाचा गुटखा व सुगंधित पानमसाला असा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पानमसाला, तंबाखूचा मुद्देमाल मिळून आल्याने ते मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या विक्री व्यवसाय करीत असताना मिळून आलेला इसम नामे
अण्णाराव भीमराव बिरादार, (वय 44 वर्ष राहणार संभाजीनगर, कवा रोड, लातूर).याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे विवेकानंद चौक चे पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अमलदार रियाज सौदागर, मनोज खोसे, साहेबराव हाके, नितीन कठारे, राहुल कांबळे यांनी पार पाडली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *