कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा उदगीर येथे “ॲग्रीफेस्ट-२०२५ ” उत्साहात प्रारंभ
उदगीर (एल.पी.उगीले) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत नंदीग्राम कृषी एवं ग्रामविकास संस्था संचलित कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा उदगीर येथे ॲग्रीफेस्ट २०२५ ला सुरुवात झाली . सदरील क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.पी सूर्यवंशी व उपप्राचार्य डॉ अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . ॲग्रीफेस्ट-२०२५ चा वेळापत्रकानुसार दि.०६.०१.२०२५ ते ११.०१.२०२५ या मध्ये होणाऱ्या विविध क्रीडा प्रकार जसे क्रिकेट सामने, कब्बडी, खो -खो , व्हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ स्पर्धा घेतल्या जाणाऱ्या असून त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रातील नृत्य ,गायन ,नाटक यांसारख्या कार्यक्रमांनी विद्यार्थी आपली कला सादर करतील.
महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी ॲग्रीफेस्ट -२०२५ मध्ये होणाऱ्या सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमाबद्दल मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमाबरोबरच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात चमकदार कामगिरी करून आपली गुणवत्ता सिद्ध करावी. असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी क्रिकेट या क्रीडा प्रकारामध्ये रंगतदार स्पर्धा पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांचा सहभाग आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक होता. यानंतर दि.०८-०१-२०२५ला हॉलीबॉल , बुद्धिबळ,कॅरम स्पर्धा व दि.९-०१-२०२५ ला कब्बडी , दि .१०-०१-२०२५ ला खो खो स्पर्धा होतील. दि.११-०१-२०२५ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाने ॲग्रीफेस्ट २०२५ चा समारोप होईल.
या ॲग्रीफेस्ट क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेसाठी संस्थेचे सचिव गंगाधरराव दापकेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
सदरील स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील मुला – मुलींचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आहे .
ॲग्रीफेस्ट २०२५ च्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.पी. सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. ए .एम. पाटील , डी.डी.ओ. डॉ.ए.जी .दापकेकर ,जिमखाना उपाध्यक्ष डॉ. वसीम शेख , क्रिडा प्रभारी प्रा.एस.एस.नवले , पंच डॉ. के. पी. जाधव, डॉ. एस.एल. खटके, डॉ. डी. एस. कोकाटे, प्रा. एस. व्ही.जाधव तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.