शिरूर ताजबंद येथे कोरोना योद्धांचा सन्मान

शिरूर ताजबंद येथे कोरोना योद्धांचा सन्मान

शिरूर ताजबंद (गोविंद काळे) : कोरोना संकटकाळात कर्तव्यनिष्ठ राहून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी अविरतपणे कार्य केलेल्या कोरोना योद्ध्यांचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आ रमेशअप्पा कराड आणि खा .सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते शिरूर ताजबंद येथील पार्थ लॉन्स येथे आयोजीत कार्यक्रमात सत्कार करून सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री विनायकराव जाधव पाटील हे होते.

शिरूर ताजबंद येथील व्यंकटेश आणि कै. बळवंतराव पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉक्टर, पत्रकार ,आशा सेविका, पोलीस – वीज – महावितरण – महसूल या विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा कोरणा योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, माजी सभापती अशोक केंद्रे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे, कृषी सभापती गोविंद चिलकुरे, अहमदपूर पंचायत समितीचे सभापती गंगासागर जाभाडे, उपसभापती बाला साहेब गुट्टे, भाजपाचे तालुकाध्यक्ष हनुमंत देवकते, शिवाजी बैनगिरे, बाजार समितीचे सभापती प्रशांत पाटील, हर्षवर्धन कसबे, भाजपा नेते राजकुमार मजगे, वसंतराव डिघोळे चाकूर पसचे उपसभापती सज्जन लोणाळे, उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी, कृउबास संचालक गोविंद नरहरे, अॅड. आर.डी . शेळके, नगरसेवक राहुल शिवपूजे, माजी सरपच बालाजी राव सारोळे, उपसरपंच प्रताप पाटील, माजी जि प. सदस्या अंजली बिलापटे, जिल्हा अरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, तालुका अरोग्य अधिकारी डॉ. सुनिल दासरे, भाजपा युवा तालुका अध्यक्ष माधव मुंढे भाजपा तालुका उपाध्यक्ष बालाजी पडोळे, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती . महेश बिलापट्टे, रणधीर पाटील, दिनानाथ चामे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. प्रस्ताविक महेश बिलापट्टे यांनी तर सुत्रसंचलन गोविंद गिरी यांनी तर आभार रणधीर पाटिल यांनी मानले. याप्रसगी शिरूर ताजबद परिसरातीलं भाजपा नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

About The Author

error: Content is protected !!