आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराराच्या वतीने आयोजीत रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराराच्या वतीने आयोजीत रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

अहमदपूर (गोविंद काळे) : सध्या जगात, देशात तसेच सबंध महाराष्ट्रात कोरोना महामारीने थैमान घातले असुन आज घडीला महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुडवडा जाणवत आहे त्या अनुषंगाने सामाजिक भान राखून, विश्वशांतिदुत, आध्यात्मिक गुरू, तथा द आर्ट ऑफ लिव्हिंगचे चे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या प्रेरणेने दि १५ जुलै रोजी आर्ट ऑफ लिविंग परिवार तर्फे संपूर्ण मराठवाड्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याविषयी सविस्तर माहीती अशी कोरोना संसर्ग रोगाच्या पार्श्वभुमिवर सध्या राज्यात रक्ताचा तुडवडा भासत आहे त्या अनुशंगाने आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातुन श्री. श्री. श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणेने सबंध मराठवाड्यात दि १५ जुलै रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे अहमदपूर येथे मृकृंद भैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले हाते या शिबीरात तब्बल ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीराचे उद्घाटन वैद्यकीय अधिक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक नानासाहेब शिंदे, डॉ. अमृत चिवडे, जयप्रकाश भुतडा, औंदुबर मुळे, महेश लोहारे, संतोष मद्देवाड, रामप्रसाद आय्या, गिरीष गादेवार, अमोल फुलारी,लक्ष्मण अलगुले, डाँ. मनकर्णा चिवडे, प्रणिता बेंबळे,रेखाताई पांचाळ, ईरफळे ताई, सुरेखा वाघमारे, प्रविण डांगे, विलास महाजन, गुणाजी भगत, शिवाजी पाटील, डॉ. सुरजमल सिंहाते, डॉ.भोसले, डॉ. मेंजर चेरेकर, डॉ.कराड, डॉ.केंद्रे जयप्रकाश आदींची उपस्थिती होती.

About The Author