लोणी ग्रामपंचायतीच्या वतीने 200 झाडाचे वृक्षारोपण

लोणी ग्रामपंचायतीच्या वतीने 200 झाडाचे वृक्षारोपण

तोंडार (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील लोणी ग्रामपंचायत चा वतीने गावात निसर्गाचे संतुलन व गाव निसर्गाचा सानिध्यात ठेवण्यासाठी लोणी मोड पासुन ते लोणी गावापर्यंत 200 व्रक्श लागवड करण्यात आले आहे. सध्यस्थित वातावरणातील बदल पाहता व्रक्शाची दिवसेंदिवस वाढत चाललेली झाडाची कत्तल त्या मुळे आज अनेक रोगराईशी सामना करण्याची वेळ प्रतेकावर आली आहे, कोरोणाचा माहामारीत नैसर्गिक ऑक्सिजन चा तुटवडा मुळे ,क्रत्रीम ऑक्सिजन तयार करुन अनेक रुग्णाचे जिव वाचविले गेले, हाच उद्देश बालगुन लोणी गाव हे निसर्गाचा कुशीत ठेउन गावकर्याचे आरोग्य साभालण्याचे आमचा ग्राम पंचायत चे कर्तव्य असल्याने आम्ही सर्व सदस्य निर्णय घेउन लोणी मोड पासुन ते लोणी गाव साधारण 2 किमी अंतर झाडे लावत असल्याची माहीती लोणी चा सरपंच सौ.उषा भुजबले यांनी दिली.व ही झाडे लाउन त्यास लोकसहभागातून ट्रि गार्ड लाउन त्या झाडाचे संपुर्ण संगोपन करुन ती झाडे जगवणार आहोत असे ही त्यानी सागितले. या वेळी सरपंच प्रतीनिधी यमुनाजी भुजबळे ,उपसरपंच वैजनाथ बिरादार, ग्रामपंचायत सदस्य शिवकांत मुळे, अंकुश केंद्रे, पांडुरंग केंद्रे, दयानंद पटवारी, जावेद शेख ग्रामविकास अधिकारी बब्रुवान पाटिल, तलाठी देवप्रिय पवार, वैद्यकीय अधिकारी हव्वाना साहेब,शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच गावातील प्रतीष्ठित नागरीक सुभाष कावर,रोहीदास मदनुरे, मारोती भुजबळे, रवी साताळे, नवनाथ राजुरे, ब्रम्हानंद मठपती, परशुराम केंद्रे, पांडुरंग पाटील राजुम्मा शेख इ.अनेक मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!