सिद्धेश्वर पाटील एक कर्तबगार सभापती – प्रा. सिद्धेश्वर पटणे

सिद्धेश्वर पाटील एक कर्तबगार सभापती - प्रा. सिद्धेश्वर पटणे
सिद्धेश्वर पाटील एक कर्तबगार सभापती - प्रा. सिद्धेश्वर पटणे

उदगीर ( एल. पी. उगिले ) : कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीरचे सभापती सिध्देश्वर उर्फ मुन्ना पाटील हे एक अतिशय दिलदार, दमदार व सदाबहार सभापती असून  सिद्धेश्वरजी उर्फ मुन्ना पाटील हे अतिशय दयाळू, दानशूर,  आदर्श व अजातशत्रू राजकीय व सामाजिक व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे गौरवोद्गार बसव ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष तथा पीटीएचे तालुका अध्यक्ष प्रा.सिध्देश्वर पटणे यांनी काढले. इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस व श्री रत्नगंगा केमिस्ट्री क्लासेसच्या वतीने हॉटेल अतिथी येथे आयोजित सिद्धेश्वर पाटील यांच्या वाढदिवस समारंभात ते बोलत होते.

          सुरुवातीला सहकारमहर्षी चंदरआण्णा वैजापुरे व सौ.लक्ष्मीबाई वैजापुरे यांच्या हस्ते शाल व  पुष्पहार घालून तर नंतर श्री.रविंद्र पाटील, प्रा.सिद्धेश्वर पटणे, व प्रा. प्रदिप वीरकपाळे यांच्या वतीने गणरायाची मूर्ती व गुलदस्ता देऊन सिद्धेश्वरजी पाटील व त्याच्या अर्धांगीनी सौ.संजीवनी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

       या वाढदिवस समारंभाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी चंद्रकांतआण्णा वैजापुरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रविंद्र पाटील साकोळकर, रमेश पाटील तोगरीकर, सुभाषआण्णा नागठाणे, द्वासे आप्पा, पीटीएचे राज्य उपाध्यक्ष प्रा.गोपाळकृष्ण घोडके, द्वारकादासचे मालक जगन्नाथराव मोरे, बालाजी पाटील नेत्रगावकर, चंदरआण्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, डॉ. संजय बिरादार, वैजनाथ पटवारी, उमाकांत सिद्धेश्वरे, इंजि.राजेश पटवारी, इंजि.अतुल चवळे, राहुल पाटील मलकापूरकर, महाराष्ट्र बसव परिषदेचे जिल्हा अध्यक्ष कुणाल बागबंदे, बसव ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष तथा पीटीएचे तालुका अध्यक्ष प्रा.सिद्धेश्वर पटणे, पीटीएचे सचिव प्रा.पप्रदीप वीरकपाळे, बामणीचे सरपंच राजकुमार बिरादार, शेतकरी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रा.दत्ता खंकरे, हेरचे उपसरपंच बेंबडे मामा, राजूआण्णा तवंडे, राम कदम, ग्रामसेवक संतोष पाटील, ज्ञानेश्वर सावळे, प्रा.पांडुरंग फड इत्यादी मान्यवर व मोठया प्रमाणात महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक प्रा. सिद्धेश्वर पटणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रदीप वीरकपाळे यांनी केले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!