मनसेने प्रतीकात्मक स्वतःला जिवंत गाढुन घेऊन विकास आघाडीच्या विरोधात केले अभिनव आंदोलन

मनसेने प्रतीकात्मक स्वतःला जिवंत गाढुन घेऊन विकास आघाडीच्या विरोधात केले अभिनव आंदोलन

उदगीर ( प्रतिनिधी ) :  गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकरी हा विविध समस्यांचा सामना करत आहे, पण केंद्रातील असो वा राज्यातील महा विकास आघाडीचे शासन असो सदैव शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत उदासीन दिसत आहे. त्यामुळे शासनाचे डोळे उघडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उदगीर वारंवार रस्त्यावर उतरून आंदोलन करत असते. तरीही शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष रामदास पाटील यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःला जमिनीत जिवंत गाढून घेऊन शेतकरी प्रश्‍नी आवाज उठवण्यासाठी अभिनव आंदोलन केले. यावेळी त्यांनी १) महा विकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्यावेळी चालू कर्ज खातेदार धारकांना 50 हजार रुपये उत्तेजनार्थ रक्कम देण्याचे घोषित केले होते पण अद्याप अनुदान मिळालेले नाही तरी ते त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे २)लातूर जिल्ह्यातील इ.स. 2019 20 सोयाबीन पिक विमा सरसकट सर्व शेतकर्‍यांना देण्यात यावा. ३)स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात. ४)शेतकऱ्यांना शेतीसाठी कमीत कमी 16 तास थ्री फेस लाईट पुरवठा करावा. ५) लोहा जिल्हा नांदेड येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या छतास फाशी घेऊन आत्महत्या केली, या प्रकरणाची कायदेशीर चौकशी करून शेतकऱ्यांस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तहसील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. या मागण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संविधानिक मार्गाने आंदोलन करून शासनास जाग आणण्याचा प्रयत्न केला. महा विकास आघाडी सरकारने वरील मागण्या बाबत शेतकरी हिताचा विचार करून त्वरित निर्णय घ्यावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यानंतर शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आक्रमक आंदोलन हाती घेईल. यामुळे  कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मान झाल्यास हे शासन, प्रशासन जबाबदार राहील. या आंदोलनाच्या वेळी तालुका अध्यक्ष संग्राम रोडगे, शहराध्यक्ष अभय सूर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष संग्राम केंद्रे ,गंगाधर पिटाळे, शहर उपाध्यक्ष संतोष भोपळे, लखन पुरी,श्रीकांत बिरादार, मनविसे शहर सचिव दिनेश पवार,विभाग अध्यक्ष गजेंद्र जाधव, गजानन तळभोगे,बालाजी पवार,शिवराज ढोले, गजानन गवरे,कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष दयानंद डोंगरे, रामदास तेलंगे,शिवाजी देवकत्ते,व्यकोबा केंद्रे,संजय केंद्रे,बालाजी केदार, बलराम केंद्रे,आदी सह अनेक महाराष्ट्र नव निर्माणचे सैनिक उपस्थित होते.

About The Author