सामाजिक जाणीवा जपण्यासाठी मोफत कान नाक घसा तपासणी शिबिर – डॉ.कुलकर्णी
उदगीर ( एल. पी. उगिले ) : तब्बल पंचवीस वर्षे उदगीर शहरात यशस्वी सेवा दिल्यानंतर सिल्व्हर जुबली साजरी करताना समाजाचे कांही देणे लागतो, या भावनेने आम्ही मोफत शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती डॉ.कुलकर्णी यांनी दिली.ते शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
गावकऱ्यांच्या सेवेसाठी दर महिन्याला एका तज्ञ डॉक्टरांची भेट अशा स्वरुपात बामणी येथे घडवून आणण्याचा मानस डॉ. धनाजी कुमठेकर यांनी केला आहे.
डॉ. धनाजी कुमठेकर यांच्या “मेघा क्लिनिक” व डॉ. संजय शे. कुलकर्णी यांच्या “गीता ई एन टी हॉस्पिटल” यांच्या संयुक्त विद्यमाने कान, नाक, घसा मोफत तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले होते.
उदगीर येथील प्रसिद्ध कान, नाक, घसा तज्ञ डॉ. संजय शे. कुलकर्णी यांच्या शिबिराने याची सुरुवात करण्यात आली आहे. तरी सर्व गावकऱ्यांनी याचा पुरेपूर फायदा घेतला असे सरपंच सौ. प्रभावती राजकुमार बिराजदार यांनी सांगितले आहे.
कार्यक्रमाचे उदघाटन चेअरमन श्री काशिनाथआण्णा बिरादार यांनी केले.
मेडिकल रिप्रेसेंटेटिव्ह श्री चेतन धनुरे यांनी मोफत औषध वाटप करून विशेष सहकार्य केले.
या प्रसंगी सौ विमल बिराजदार, श्रीमती सरस्वती बिराजदार , सौ महानंदा सावरे, प्रयागमाय कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, नामदेव म्हेत्रे, दादाराव इंचुरे, जेष्ठ नागरिक रावण महाराज, मुरली महाराज लासुने, काशिनाथ गंगापूरे,सुज्ञान पाटील, राजू कांबळे, गणपत कांबळे , नंदकिशोर कांबळे इत्यादी गावकरी उपस्थित होते.
डॉ. संजय कुलकर्णी, डॉ. धनाजी कुमठेकर, डॉ.अजित पाटील, सिस्टर चिल्लरगे मॅडम, आशा कर्मचारी रूपा कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.प्रास्ताविक डॉ.धनाजी कुमठेकर यांनी केले.
या शिबिराचे आयोजन राजकुमार बिराजदार, सुनिल पाटील, विजयकुमार पाटील आणि समस्त ग्रामपंचायत सदस्य यांनी केले होते.आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन राजकुमार बिरादार यांनी केले.