आंतरराष्ट्रीय योगशिक्षक परीक्षेत माजी खासदार डॉ.सुनील गायकवाड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण लातूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब

आंतरराष्ट्रीय योगशिक्षक परीक्षेत माजी खासदार डॉ.सुनील गायकवाड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण लातूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब

लातूर ( प्रतिनिधी) : आयुष मंत्रालय भारत सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योगशिक्षक परीक्षेत लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खासदार प्रोफेसर डॉ.सुनील बळीराम गायकवाड हे प्रथम श्रेणीत (distinction) मधे उत्तीर्ण झाले आहेत. ते भारतातील पहिले माजी खासदार ठरले आहेत ज्यांनी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची योगशिक्षक परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांना पतंजली युवा जिल्हाध्यक्ष अमर वाघमारे यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल डॉ सुनील गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
डॉ सुनील बळीराम गायकवाड हे अनेक विषयात उच्च पदवी घेतलेले आणि व्यवस्थापन शास्त्र मध्ये डॉक्टरेट घेतलले असून त्यांनी आयुष मंत्रालय नी घेतलेल्या आंतरराष्ट्रीय योगशिक्षक परीक्षेत उच्च श्रेणी चे मार्क्स घेऊन पास झाले आहेत.
मित्र परिवारा कडून त्यांचं कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.

About The Author

error: Content is protected !!