‘विश्व हिंदु परिषद, बजरंग दल’ अहमदपुरच्या वतीने पंढरपुर दिंडी पायी वारीला परवानगी मिळावी यासाठी भजन आंदोलन

'विश्व हिंदु परिषद, बजरंग दल' अहमदपुरच्या वतीने पंढरपुर दिंडी पायी वारीला परवानगी मिळावी यासाठी भजन आंदोलन

अहमदपूर (गोविंद काळे ) : देशात सर्वत्र जनजीवन सामान्य होत असताना, हॉटेल, मॉल, दारूची दुकाने, बाजारपेठा, लग्न समारंभ, सरकारी जाहीर कार्यक्रम सर्रास सुरू आहेत. त्यात विनामास्क फिरणाऱ्या शेकडो हजारोंची गर्दी होत आहे. लोक हवे तिथे मुक्त प्रवास करत आहेत. महाराष्ट्रात मुबलक लसीकरणाद्वारे कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली असतानाही सर्व बंधने फक्त शिस्तप्रिय वारकऱ्यांवर विठ्ठलाच्या भक्तांवर लादली जात आहेत. हे शासन हिंदू विरोधी आहे की काय याची आता शंका येत आहे. जे मुघलांच्या राजवटीत घडले तेच हे शासन करत आहे असे निवेदन तहसीलदार यांना आज १७ जुलै रोजी देण्यात आले.

तहसील कार्यालयांसमोर भजन किर्तन करत असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत भजनी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री मधुकरजी धडे, विहिंप अध्यक्ष विनोद भुतडा, विहिंप ता. धर्मजागरण प्रमुख ह. ब. प. कैलास मद्दे, बजरंग दल ता. संयोजक गजानन चंदेवाड, हिंदू जागरण मंचचे विभाग कार्यकर्ते विधींज्ञ स्वप्निल व्हत्ते, राजुर तालुक्यातील किर्तनकार व वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी परमेश्वर पांचाळ महाराज टाकळगाव, विष्णु चोपडे महाराज हिप्परगा, माने महाराज, दिंगाबर डोंगरे महाराज, सुभाष गुडिंले महाराज, अशोक महाराज टेंभुर्णी, नाथराव महाराज नागझरी, प्रभु महाराज थोडगेवाडी, व स्वयंसेवक शुभम ढेले, व्यंकट बोरेवार, प्रविण हामणे, रमेश ढाकणे, रवी कच्छवे, नितेश सिंहाते, दिपक हिवरे, नारायण हिवरे, अक्षय जाधव, कृष्णा जोशी राम रत्नपारखे, अनिल घोडके कीर्तनकार महाराज, आदी उपस्थित होते. या आंदोलनात लाक्षणिक उपोषण, कीर्तन भजन असा साखळी पद्धतीने कार्यक्रम झाला. तसेच तहसीलदार प्रसाद कुलकर्णी साहेबांना निवेदन सादर केले. सरकारने वारकऱ्यांच्या मागण्यांविषयी त्वरित निर्णय न घेतल्यास येत्या काळात महाराष्ट्रव्यापी आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा या वेळी देण्यात आला.

About The Author