विलास सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी विलासराव देशमुख सहकार पॅनलकडून उमेदवारी अर्ज दाखल

लातूर (एल.पी.उगीले)
विलास सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या २१ जागासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी राज्याचे माजी मंत्री आमदार, संस्थापक चेअरमन अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील विलासराव देशमुख सहकार पॅनलच्या २१ उमेदवाराचे अर्ज दाखल केले आहेत.
राज्याचे माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख यांच्या युवा नेतृत्वात स्थापन झालेल्या विलास साखर कारखान्याने मागच्या २५ वर्षात उत्कृष्ट कार्य व व्यवस्थापनाची अनेक उच्चांक प्रस्थापित करुन साखर कारखानदारी क्षेत्रात आदर्श निर्माण केला. या माध्यमातून लातूर तालुका व जिल्हयात आर्थिक क्रांती घडवली आहे. ग्रामिण जीवनमान उंचावले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे प्रेरणा, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख, माजी आ. धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली मावळत्या संचालक मंडळाने अत्यंत उत्कृष्टरीत्या काम करून ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, शेतमजूर यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी अत्यंत उत्तम काम केले आहे.
मांजरा परीवारात स्थापन झालेला आणि अत्यंत कडकशीस्तीच्या वातावरणात वाटचाल करीत असलेला विलास सहकारी साखर कारखान्याने एकुण २४ गळीत हंगामात ३६ पेक्षा अधिक राज्य आणि देशपातळीवरील पुरस्कार आणि पारीतोषीके मिळवली आहेत. नेहमीच आधुनीक तंत्रज्ञान आणि प्रयोगशीलतेचा अवलंब करीत ऊस उत्पादकांना अधिकांत अधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न या कारखान्याच्या माध्यमातून झालेला आहे. संचालक मंडळाने फक्त विश्वस्थांची भुमिका निभावल्यामुळे प्रत्येक सभासद शेतकऱ्यांला हा कारखाना आपल्याच मालकीचा असल्याचा विश्वास वाटतो आहे.
यावेळी कारखान्याच्या नेतृत्वाकडून संचालक मंडळासाठी उमेदवार निवडतांना अनुभवी आणि नवख्या उमेदवारांचा उत्तमरीतीने समावेश केला आहे. आता पर्यंतच्या संचालक मंडळातील ५ जुने संचालक, ८ विद्यमान संचालक तर ८ नवीन प्रतिनीधी यांचा या २१ उमेदवारात समावेश आहे.
विलासराव देशमुख सहकार पॅनलमध्ये उमेदवारी मिळालेल्या सर्व उमेदवारांनी सहकार क्षेत्रातील मान्यवर नेते व पदाधिकारी यांच्यासह लातूर जिल्हा परीषद प्रागंणातील माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळयास अभिवादन करुन लातूर येथे उपविभागीय अधिकारी तथा निवडणुक अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले.
विलासराव देशमुख सहकार पॅनलमधून उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था मतदारसंघ देशमुख अमित विलासराव, महीला प्रतिनीधी देशमुख वैशाली विलासराव, देशमुख लताबाई रमेश, ऊस उत्पादक मतदारसंघ निवळी (वैशालीनगर) गट काळे रविंद्र व्यंकटराव, बुलबुले नरसिंग दगडू, पटेल रसुल दिलदार, शिराळा गट पालकर तात्यासाहेब छत्तू, पाटील रंजीत राजेसाहेब, मोरे गोवर्धन मोहनराव, कासारजवळा गट शिंदे वैजनाथराव ग्यानदेवराव, बारबोले आनंत व्यंकटराव, पवार हणमंत नागनाथराव, विलासनगर (चिंचोलीराववाडी) गट साळुंके (देशमुख) नेताजी शिवाजीराव, पाटील नितीन भाऊसाहेब, साळुंके रामराव विश्वनाथ, बाभळगाव गट देशमुख अमित विलासराव, जाधव अमृत हरिश्चंद्र, शिंदे (पाटील) सतिष विठ्ठलराव, अनुसुचीत जाती प्रतिनीधी बनसोडे दिपक अर्जुन, इतर मागसवर्गीय प्रतिनीधी बरुरे शाम भारत, भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग माने सुभाष खंडेराव यांचा समावेश आहे.